पान:मेणबत्त्या.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६


 ३. स्टिअरीन:-चरबीच्या वर्णनांत लिहिल्याप्रमाणे स्टिअरीन हा घट्ट पदार्थ तिच्यांतून काढितात. चरबीचे पातळ होण्याचे उष्णमान ९९° पासून १११° फा० अंश आहे. तेंच स्टिअरीनचे १४४° फा० अंश आहे. जर चरबीतील ओलिईन काढून टाकले तर बाकी राहिलेल्या स्टिअरीनचे पातळ होण्याचे उष्णमान सहज वाढते. ह्मणूनच चरबी प्रेसमध्ये दाबून तिच्यांतील पातळ पदार्थ में ओलिईन ते काढून टाकितात.. तेंच स्टिअरीन दोन तीन वेळ पुनः पुनः दाबल्याने चांगल्या प्रतीचे स्टिअरीन निघू शकते. ते मेणासारखें घट्ट व पांढऱ्या रंगाचे असते. - परंतु त्यास किंचित् चिकटपणा असून त्यांत ग्लिसराईन असतेच. त्यामुळे त्याच्या मेणबत्तीचा प्रकाश पाहिजे तितका स्वच्छ पडत नाही. याच्या केलेल्या मेणबत्तीस साधारण स्टिअरीन क्यान्डल ( मेणबत्ती) ह्मणतां येईल. परंतु असें स्टिअरीन मेणबत्त्यांस्तव हल्ली कचितच तयार करितात. अलिकडे शुद्ध स्टिअरीक व पामिटीक आसिडे तयार करून त्यांच्या मेणबत्त्या तयार करतात.

वनस्पतिज तेलें.

 ४.खोबऱ्याचें तेल:-हे तेल साधारण हवेवर तुपासारखें पांढरें व घट्ट असते. यांत बरीच पातळ व घट्ट स्निग्ध आसिडें आहेत. याचे पातळ होण्याचे उष्णमान ७३ पासून ८० फा० अंश आहे. हे ताजें असले म्हणजे त्यास मधुर चव व सुगंध असतो. हे लवकर खवट होते. चरबीप्रमाणे हे तेलही दाबून त्यांतून एक पांढरा बराच घट्ट पदार्थ काढतात. त्यास 'कोकोनट स्टिअरीन' ह्मणतात. कोकोनट स्टिअरीनचे पातळ होण्याचे उष्णमान ७५ फा० अंश आहे. हे पातळ होण्याचे उष्णमान फार कमी असल्याने चांगल्या मेणबत्त्या करण्याच्या कामी याचा उपयोग होत नाही. नाईटलाईटस ह्मणजे पणत्या, दिवे