पान:मेणबत्त्या.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४



 ३. मेण-अ प्राणीज, ब वनस्पतीज, क खनिज-मेण ह्यांचा समावेश होतो.

 अ. प्राणिज मेण— यांत मधमाशांच्या मोहळांचें, पिला अथवा चिनी मेण व स्पासिटी इतक्यांचा समावेश होतो.
 ब. वनस्पतिज मेण—यांत करनोबा मेण, चिनी वनस्पतींपासूनकाढलेले मेण, जपानी मेण, मिरटील मेण व ताडाचे मेणइतक्यांचा समावेश होतो.
 क. खनीज मेण–प्याराफीन व ओझोकिरीट असे दोन प्रकारच मेण या वर्गात येते.
 ४. स्निग्ध आसिडें-यांत स्टिअरीक आसिड व पामिटीक आसिड यांचा समावेश होतो. "

 पुढील माहिती वाचण्यापूर्वी तिच्यांत येणाऱ्या कांहीं रसायनिक व सारख्याच शब्दांचा अर्थ बरोबर समजला पाहिजे. ह्मणून ते शब्द सार्थ प्रथम लिहितो. ह्मणजे त्यांचे वर्णन समजण्यास अर्थाचा घोटाळा होणार नाही.
 १. स्टिअरीक आसीड व ग्लिसराईन मिळून स्टिअरीन झाले आहे.
  २. पामिटीक आसीड व ग्लिसराईन मिळून पामिटीन झाले आहे.
 ३ . ओलिईक आसीड व ग्लिसराईन मिळून ओलिईन झाले आहे.

यांतील पहिला व तिसरा प्रत्येकांतील पदार्थ एकमेकांपासून भिन्न आहे.

 चरबी:-हा तुपासारखा पांढरा व घट्ट पदार्थ आहे. बाजारांत मिळणारी चरबी बकऱ्यांची, मेंढ्यांची, बैलांची व इतर जनावरांचीही असते. हिचे मुख्य घटक स्टिअरीन, पामिटीन, ओलिईन व ग्लिसराईन हे आहेत.ह्या तिन्ही घटकांपैकी चरबीमध्ये पहिल्याचे अधिक प्रमाण असते. चरबीमध्ये स्टिअरीक आसीड जसजसे अधिक असते त्याप्रमाणे ती चरबी अधिक घट्ट असते; आणि तिचे पातळ होण्याचे उष्णमानहीं