पान:मेणबत्त्या.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३


माल आणून त्यांत थोडा फेरफार करून त्यास मेणबत्त्यांचा आकार मात्र तेथे देतात. या मेणबत्त्या दिसण्यांत व जळण्यांत चांगल्या नसतात असें पुष्कळ लोकांचे झणणे आहे. कानपुरच्या मेणबत्त्या दिसण्यांत चांगल्या पण जळण्यांत लवकर जळतात. रंगूनच्या मेणबत्या प्याराफीनच्या असून चांगल्या तयार होतात. अशा रंगूनच्या उत्तम मालासही अमदाबादच्या १९०२ च्या प्रदर्शनांत बक्षीस मिळाले नाही, याचे आश्चर्य वाटते. वरील तीनही ठिकाणच्या मेणबत्त्या किमतीने स्वस्त आहेत.


भाग २ रा.
द्रव्ये व त्यांची उत्पत्ति

.

 मेणबत्त्या करण्याच्या कामी ज्या द्रव्यांचा उपयोग करितात ती द्रव्ये कोणती व त्यांपासून कोणकोणते पदार्थ काढतात ही माहिती या कामी अवश्य आहे ह्मणून तें वर्णन ह्या भागांत दिले आहे.
 मेणबत्त्या करण्याच्या कामी ज्या मूळ द्रव्यांचा मुख्यत्वेकरून उपयोग करतात ती द्रव्ये खाली लिहिली आहेत.
 १. प्राणिज स्निग्ध पदार्थ— [ चरबी ]-यांत चरबी, लार्ड क स्टिअरीन यांचा समावेश होतो.
 २. वनस्पतींची तेले— यांत खोबऱ्याचें, ताडाचें, ताडाच्या खोबऱ्याचे व पायनी तेल इतक्यांचा समावेश होतो.