पान:मेणबत्त्या.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२


र्थीचाही उपयोग मेणबत्त्या करण्यांत होऊ लागला. हळूहळू आणखीही बरेच पदार्थ या कामी वापरण्याचा प्रचार व शोध चालू आहेच. अगदी अलीकडे पातळ ओलीईक आसीडाचे व पातळ वनस्पतिज तेलांचे रसायन रीतीने घट्ट व स्निग्ध आसीड बनवितात. पुष्कळ प्राणिज व खनिज ब वनस्पतिज द्रव्ये मेणबत्त्या करण्याचे कामी उपयोगी आहेत. परंतु व्यापाराचे कामी चरबी, खोबरेल, ताडाचें तेल, पेट्रोलियम, रंगून तेल, माशांचें तेल, मोहाच्या बियांचे तेल, सरक्यांचे तेल व क्वचित भुईमुगाचे दाण्याचे तेल, वगैरे पदार्थ मेणबत्त्यांचे द्रव्य तयार करण्यास वापरतात. जेथे जेथें जो पदार्थ स्वस्त मिळतो तेथे त्याचा शोध करून उपयोग करतात. आपल्या हिंदुस्थान देशांत बऱ्याच प्राचीन काळापासून मेणाच्या मेणबत्त्या तयार करीत होते. त्याशिवाय दुसऱ्या प्रकारचा, मेणबत्त्यासारखा प्रकाश देणारा पदार्थ आपले देशी तयार होत असल्याबद्दलची माहिती मिळत नाही; व दंतकथांवरूनही ऐकण्यात येत नाही. परंतु मलबारप्रांती राळेच्या झाडाच्या चिकाच्या मेणबत्त्या करतात असे डॉ. मंत्री यांच्या वनस्पति कोशांत लिहिले आहे. मेणबत्ती ही जाळण्याच्या कामी उपयोगास येणारापैकी एक पदार्थ आहे. हिच्या शोधांत सुमारे ७० वर्षात विद्वानमंडळीच्या प्रयत्नाने बरेच फेरफार होत गेले व अझूनही शोध चालू आहेतच. ही गोष्ट उद्योगी लोकांची झाली. आह्मी हिंदुस्थानवासी मात्र अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतो ह्मणूनच दहा पंधरा लाख रुपये दरवर्षी देऊन परस्थ लोकांनी बनविलेल्या मेणबत्त्या खरीद करतो. या गोष्टीची आह्मांस लाज वाटली पाहिजे. त्याशिवाय आमचे पाऊल हुन्नर-कला-कौश्यल्यांत पुढे पडणार नाही.
 हल्ली हिंदुस्थानांत कानपूर येथें नार्थ-वेस्ट सोप कंपनी, अमदाबाद येथे एक गुर्जर गृहस्थ व रंगून येथे एक युरोपियन कंपनी अशा तीन कारखान्यांत मेणबत्त्या तयार होतात. अमदाबादचे गृहस्थ मूळ विलायती