पान:मेणबत्त्या.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११



गले. या पदार्थाच्या मेणबत्त्या फारच उत्तम होतात ह्मणून त्या मेणबत्त्यांस किंमतही जास्त पडते.
 याप्रमाणे घट्ट व स्निग्ध आसिडे काढून मेणबत्या करण्याच्या निरनिराळ्या रीति प्रचारांत आल्या.
  प्रथम मेणाच्या मेणबत्त्या करीत होते. नंतर चरबी दाबून निघालेल्या कठिण द्रव्याच्या मेणबत्त्या करूं लागले. पुढे स्टिअरिक आसिडाच्या मेणबत्त्या निघाल्या. नंतर खोबरेल तेलापासून दाबाने घट्ट द्रव्य काढून त्याचा उपयोग या कामी करू लागले. नंतर पामिटीक आसीड, नंतर स्टिअरीक आणि पामिटीक आसीड यांचा संयुक्त पदार्थ में मारगरीक आसीड ह्याचा उपयोग ह्या कामी होऊ लागला. पुढे स्परम्यासिटी, प्याराफीन, ओझोकिरीट या पदार्थाचा शोध लागल्याने त्यांचाही उपयोग या कामी होऊ लागला.
 सन १८२५ पूर्वी मेणाच्या मेणबत्त्या व चरबी दाबून तिच्यांतून घट्ट द्रव्य काढून तिच्या मेणबत्त्या करण्याची रीत माहीत होती. १८२५ मध्ये चिव्हरलसाहेबांनी साफोनिफिकेशन रीतीचा शोध लावून स्निग्ध पदार्थातील घट्ट पांढरें द्रव्य काढण्याची रीत प्रचारांत आणली. सन १८४३ पर्यंत मुख्यत्वेकरून दाबाने व साफोनिफिकेशन रीतीने स्निग्ध पदार्थीतील घट्ट द्रव्ये काढून मेणबत्त्या करीत असत. सन १८४३ साली आसिडीफिकेशन रीत सुरू झाली. या दोन्ही रीति फ्रेंच लोकांनीच मूळ काढल्या आहेत. सन १८५४ साली हायप्रेशर रीत अमेरिकेंत सुरू झाली. पहिल्या दोन रीतींत स्निग्ध पदार्थाचे भिन्नीकरण करण्यास सोडा, किंवा सलफ्युरीक आसिडाचा उपयोग करावा लागे; त्यामुळे खर्च अधिक होत होता. परंतु अमेरिकन शोधाने इतर पदार्थांच्या मिश्रणाशिवाय उष्णता व दाब यांच्या योगाने स्निग्धपदार्थाचे भिन्नीकरण कर: ण्याची युक्ति निघाली. पुढे स्परम्यासिटी, प्याराफीन, ओझोकिरीट या पदा―