पान:मेणबत्त्या.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०


घेतले. त्याने या शोधा अंती असे ठरविले की, स्निग्ध पदार्थ व पाणी यांचे मिश्रण एका गरम नळीतून आरपार काढून घ्यावे. या नळीचें उष्णमान ८००° फा० अंश असावें. तीतून मिश्रण काढतांना त्यावर दर चौरस इंचास २,००० पौंडाचा दाब पडावा. इतक्या गोष्टी पूर्ण झाल्या ह्मणजे त्या स्निग्ध पदार्थाचें भिन्नीकरण होऊन त्यांतील ग्लिसराईन व स्निग्ध आसिडें निरनिराळी होतात. वरची आसिडें काढून घेऊन दाबाखाली पातळ व घट्ट आसिडें निराळी करितात.
 मेसर्स विलसन व पेन यांनी त्यांत फेरफार करून एक रीत काढून तिचे पेटंट घेतले ती रीत:-स्निग्ध पदार्थात फार उष्ण वाफ साधारण दाबाखाली सोडली ह्मणजे स्निग्ध पदार्थाचे पृथक्करण होतें. नंतर नळिकायंत्राने ग्लिसराईन व स्निग्ध आसिडें अर्करूपाने काढावीत. ती, स्निग्ध आसिडें दाबाने निराळी करावीत. अशी रीत आहे. तीस हायप्रेशर रीत ह्मणतात; व ती सन १८५४ पासून सुरू झाली. न  युरोपखंडांत आटोक्लेव्ह रीतीने स्टिअरीक आसिड काढितात; ती रीतः-एका तांब्याच्या मजबूत भांड्यांत चरबी व ताडाचे तेल टाकून त्याच्या दर चौरस इंचावर २५० पौंडांचा दाब पडेपर्यंत त्यांत गरम वाफ सोडतात. त्या भांड्यास एक ढवळ्याचे यंत्र लागू करून आंतील मिश्रण सतत ढवळत ठेवावे लागते. त्याच दाबाखाली व उष्णतेवर तें मिश्रण कित्येक तास ढवळत ठेवले ह्मणजे भिन्नीकरण पूर्ण होते. नंतर वरची स्निग्ध आसिडे काढून घेऊन दाबाने निराळी करितात. या रीतीस आटोक्लेव्ह प्रोसेस ह्मणतात.
 पुढे स्परम्यासिटी ह्मणून एक पांढरा व घट्ट पदार्थ माशाच्या तेलांत सांपडला; त्याच्या मेणबत्त्या बनवू लागले.
 प्याराफीन ह्मणून एक पदार्थ खनिज तेलांत व विशेषेकरून रंगून येथील खाणीच्या तेलांत सांपडला. त्याचाही उपयोग या कामी करूं ला—