पान:मेणबत्त्या.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 त्यानंतर सन १८४३ पर्यंत मेणबत्या करण्याच्या बऱ्याच युक्त्या निघून त्यांबद्दल बरीच पेटंटे घेण्यात आली. परंतु व्यापारी रीतीने सोईवार माल तयार करण्यांत त्यांचा फारसा उपयोग झाला नाही.
 २. आसिडीफिकेशन रीत-सन १८४३ सालांत एम. फ्रेमी या फ्रेंच गृहस्थाने स्निग्ध पदार्थ आलकलीबरोबर उष्ण करण्याचे ऐवजी आसिडाबरोबर उष्ण करून स्निग्ध आसिडे निघतात, असा शोध लावला, व त्या शोधाचे ग्रहण मि. वुलइसन वग्वाईन यांनी केल. ती रीत:-फार उष्णमानावर चरबीच्या तेलांत तीव्र सल्फ्युरीक आसीड मिश्र करावे. सहा टन तेलास, सात हंडरेडवेट सल्फ्युरीक आसीड लागते. चांगले मिश्र झाले ह्मणजे तेलांतील ग्लिसराईनचे सलफोग्लिसरीक आसीड बनते. त्या मिश्रणाचा काळा गोळा तयार होतो. नंतर तो धुवून नळिकायंत्रांत ठेवतात. तेथे फार ऊष्णमानाच्या वाफेखाली त्यांतील स्निग्ध आसिडें अर्करूपाने काढतात. नंतर ती पातळ व घट्ट स्निग्ध आसिडें दाबाने निराळी करतात. चरबीच्या तेलापासून स्टिअरीक आसीड, व ताडाच्या तेलापासून पामिटीक आसीड निघते. हीच दोन्ही घट्ट आसिडें. मिश्र करून केलेल्या मेणबत्तीस हल्ली कम्पोझिट क्याडल ह्मणतात, याप्रमाणे तयार केलेले पामिटीक आसीड मे. प्राईस व कंपनीचे लोक पुनः उष्ण दाबाखाली दाबून काढितात; त्यास बेलम न्ट स्पर्म ह्मणतात. मे. प्राईस कंपनीच्या मेणबत्त्यांच्या पुष्कळ पुडक्यांवर 'बेलपान्ट स्पर्म' असें नांव लिहिलेले आढळते. त्या कंपोझिट जातीच्या मेणबत्त्या असाव्या असे वाटते. याप्रमाणे आसिडीफिकेशन रीत सन १८४३ मध्ये सुरू झाली.
 ३. हायप्रेशर रीत:-सन १८५४ साली मि० टिलघमन नांवाच्या अमेरिकन गृहस्थाने स्निग्ध पदार्थ पाण्यामध्ये उष्ण करून दाबाखाली त्यांतील ग्लिसराईन व स्निग्ध आसिडें निराळी करण्याचे पेटंट