पान:मेणबत्त्या.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


येत होती. ह्मणून त्यांचा प्रसार फार मोठा झाला नाही. चरबी व ताडाच्या तेलाच्या घटकाहून, खोबरेल तेलाचे घटक फार भिन्न आहेत. खोबरेल तेलांत ग्लिसराईन फार थोडे व स्निग्ध आसिडें पुष्कळ आहेत. त्यांपैकी क्यापोईक व क्याप्रिलीक ही आसिडे फार कमी उष्ण मानावर जळणारी आहेत व जळतांना त्यांचा गंध फार तिखट येतो. विशेषेकरून ती मेणबत्ती विझाली असतां तो उग्र व तिखट वास अधिक येतो. ह्मणून त्या वेळेस त्या मेणबत्त्यांचा उपयोग करण्यास वरील अडचण उत्पन्न झाली. मि. विलसन साहेबांची कम्पोझिट (मिश्र) मेणबत्ती निघाली तेव्हा मात्र ती लोक प्रिय झाली. मिश्र मेणबत्तींत खोबरेल तेलांतील स्टिअरीन व खरें स्टिअरीक आसीड असे दोन पदार्थ मिश्र होते. त्या मेणबत्त्यांचा खप अद्यापही बराच होत आहे. परंतु हल्लीच्या व त्या वेळेच्या कम्पोझीट मेणबत्तीच्या घटकांत बराच फेरफार आहे.
  सन १८४० सालांत मि. ग्वाईन या फ्रेंच गृहस्थाने, निर्वातस्थळी व हवेच्या दाबाखाली स्निग्ध आसिडें नळिकायंत्राने अर्कवत काढण्याचे पेटंट घेतले. परंतु व्यापारी माल तयार करण्यांत या रीतीचा चांगला उपयोग झाला नाही.
 सन १८४२ साली मेसर्स प्राईस कंपनी यांनी डब्ल्यू. सी. जोन्स "या नावाखाली एकट्या खोबरेलापासून व खोबरेल आणि चुना यांच्या साबूपासून नलिकायंत्राने अर्कवत अर्करूपाने स्निग्ध आसिडे काढण्याचे पेटंट घेतले. त्यापासून झालेल्या मेणबत्त्या फार चांगल्या होत होत्या. परंतु नुसत्या खोबरेलापासून नळिकायंत्राने काढलेल्या द्रव्याच्या मेणबत्तीस जळतांना वाईट वास येतच होता. खोबरेल व चुना यांच्या साबूपासून नलिकायंत्राने काढलेल्या द्रव्याच्या मेणबत्त्या फारच चांगल्या असून त्यांत कोणताही दोष नव्हता. परंतु त्या किंमतीने फार महाग पडत असत.