पान:मेणबत्त्या.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 ३. तिसरी रीत ह्मणजे मि. टिलघमन साहेबांनी केलेल्या शोधांत थोडा फेरफार करून काढलेली तीस हायप्रेशर रीत ह्मणतात.
  • या रीतींचे वर्णनः-
 १. सापोनिफिकेशन:-स्निग्ध पदार्थात असणाऱ्या ग्लिसराईन नामक पदार्थाची रसायनप्रीति, आसीड मुळापेक्षा, आलकली मुळाबरोबर अधिक आहे. ह्मणून स्निग्ध पदार्थ सोडा अथवा चुन्याबरोबर उष्ण केला तर त्यांतील ग्लिसराईन सुटे पडते व साबू तयार होतो. जर सोडा वापरला तर तो साबू पाण्यांत द्रवीभूत होतो व चुना वापरला तर तो साबू पाण्यांत अविद्राव्य होतो. याच तत्त्वावर सापोनिफिकेशन रीतीची कल्पना निघाली आहे. स्टिअराईन व पुढे स्टिअरीक आसीड काढण्यांत ह्याच रीतीचा उपयोग चिव्हरल साहेबांनी केला होता, ह्मणून तीस त्यांनी सापोनिफिकेशन रीत असें झटले आहे. नंतर त्या साबूतील ग्लिसराईन निराळे करून राहिलेला साबू, तीव्र सल्फ्यूरिक आसिडाच्यायोगानें विद्रवित करितात. ह्मणजे त्या मिश्रणावर पातळ व घट्ट स्निग्ध आसिडें तरंगत असतात. ती वरची आसिडे काढून घेऊन दाबाने निराळी करितात. त्यावेळेस चिव्हरल साहेब फक्त चरबीचाच उपयोग या कामी करीत होते.
 सन १८३६ मध्ये मेसर्स हेमपेल व ब्लंडेल यांनी ताडाच्या तेलापासून सापोनिफिकेशन रीतीने मेणबत्त्या करण्याचे पेटंट घेतले. परंतु त्या मेणबत्त्या रंगांत काळ्या व स्पर्शास तेलासारख्या चिकट होत्या ह्मणून फारशा लोकप्रिय झाल्या नाहीत.
 सन १८२९ मध्ये मि० सोनास याणी खोबरेल तेलापासून दाबानें घट्ट व पातळ द्रव्ये काढण्याचे पेटंट घेतले. त्यांपैकी घट्ट द्रव्यांचा मेणबत्त्यांच्या कामी उपयोग केला. दाबलेल्या चरबापक्षां खोबऱ्याचे स्टिअरीन अधिक चांगले ठरले. परंतु त्या मेणबत्त्यांस काजळी फार