पान:मेणबत्त्या.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 परंतु स्थिर तेल हा संयुक्त पदार्थ आहे. त्यांत एक किंवा अधिक स्निग्ध आसिडें व ग्लिसराईन, एथील व सेटील या जातीचा द्रव असे घटक असतात.
 चरबी हा पदार्थ स्टिअरीन व ओलीईन या संयुक्त पदार्थांचा बनलेला आहे. त्यांपैकी ओलीईन नुसत्या दाबाने तिच्यांतून काढतात. त्या ओलीईनचा उपयोग हल्ली कृतीचे लोणी करण्यांत फार होतो. साबूत वापरले जाणारे ओलीईन हे नव्हे. साबूच्या कामी वापरले जाणारे ओलीईन झणून जो पदार्थ असतो तो ओलीईक आसीड होय. ओलीईन हा पदार्थ ओलीईक आसीड व ग्लिसराईन मिळून बनलेला आहे. स्टिअरीन हा पदार्थ स्टिअरीक आसीड व ग्लिसराईन मिळून बनलेला आहे. ताडाच्या तेलांत मेणबत्यांच्या उपयोगी जो पदार्थ आहे त्यास पामीटीक आसीड ह्मणतात. पामीटीक आसीड व ग्लिसराईन मिळून जो पदार्थ ताडाच्या तेलांत असतो त्यास पामिटीन ह्मणतात. मेणबत्याच्या कामी ताडाचे तेल हा पदार्थ चरबी सारखाच उपयोगी आहे.'
 मेणबत्त्यांच्या कामी उपयोगी पडणारी स्टिअरीक क पामिटीक आसिडें काढण्यास्तव त्या मूळ द्रव्यांचे भिन्नीकरण करावे लागते. तें भिन्नीकरण करण्याच्या हल्ली तीन रीति प्रचारांत आहेत. त्यांचा इतिहास मणजे मेणबत्त्यांच्या कामी जी सुधारणा झाली तिचा इतिहास होय. ह्मणून त्या रीतींची त्रोटक माहिती देतो.
 १. पहिली व जुनी रीत ह्मणजे चिव्हरल साहेबांनी काढलेली व मिली साहेबांनी स्वीकारलेली रीत होय. तीस सापोनिफिकेशन रीत म्हणतात.
 २. दुसरी रात मि. विलसन साहेबांनी पुरी केली. तीस आसिडीफिकेशन रीत ह्मणतात.