पान:मेणबत्त्या.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



कारखान्यांत उत्तम प्रकारच्या मेणबत्त्या तयार झाल्या. चिव्हरल साहेबांच्या सांगण्यावरून पारीस येाल कलोत्तेकजक मंडळीने कांहीं शर्तीवर दोन टन मेणबत्त्या तयार करणारास ४००० फ्रांकचे बक्षीस काढले. त्या शर्ती खाली लिहिल्याप्रमाणे होत्याः—
१. मेणबत्त्यांची किंमत दर पौंडास ९ पेन्सांपेक्षा जास्त नसावी.
२. मेणबचीचा प्रकाश तिच्यांतील स्टिअरीनच्या वजनाइतका मिळावा; व तो प्रकाश मेणाच्या मेणबत्तीच्या प्रकाशापेक्षा कमी नसावा.
३. मेणबत्ती जळतांना वाईट वास, धूर किंवा ओघळ येऊ नयेत. व ती कठिण आणि सुकी असावी.
४. मेणबत्ती पातळ होण्याचे ऊष्णमान १२२° फा. अंशांपेक्षा कमी नसावें. इ० इ०
 मेसर्स मोटार्ट व मिली यांनी वरच्या शर्तीवर ज्या मेणबत्त्या तयार केल्या त्यांत पहिलीशिवाय सर्व अटी पूर्ण झाल्या होत्या. त्या मेणबत्यांची किंमत शर्तीमधील किंमतीपेक्षा दुप्पट पडूं लागली. ह्मणून त्याप्रमाणाने तें बक्षीस त्यांस मिळालें.
 या कामीं मिली साहेबांनी चिव्हरल साहेबांच्या ज्या शोधांचा उपयोग केला त्यांची हकीगत ह्या ठिकाणी लिहिणे अप्रशस्त होणार नाही.ती हकीगत:—  ‘तेले दोन प्रकारची असतात. १ स्थिर तेलें. २ अस्थीर तेलें. अस्थिर तेलांचे घटक, स्थिर तेलांच्या घटकाहून भिन्न असतात. ह्मणून अस्थिर तेलें जालण्याच्या उपयोगास अयोग्य होत.
 प्रत्येक स्वाभाविक वस्तूंत काही तरी निराळं आसीड असतेच. त्याचप्रमाणे तिच्यांत एक विशेष प्रकारचे अस्थिर तेलही असते. प्रत्येक वस्तूस काही तरी गंध येत असतोच; व तो गंध येण्याचे कारण त्या बस्तूंत असणारे अस्थिर तेल होय.