पान:मेणबत्त्या.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



त्यांचे घटक संयुक्त असून मिश्र मूळ पदार्थाचे आहेत. सर्व स्निग्ध पदार्थ, कठिण व नरम अशा द्रव्यांनी स्वभावतःच बनलेले आहेत. त्या कठिण नरम द्रव्यापैकी दरेकांत स्निग्ध आसीड व ग्लिसराईन मिश्र आहे."
  हा शोध स्टिअरीक आसीड काढण्याच्या धंद्याचा मूळ पाया झटला तरी चालेल.
 निसर्गाने लावून दिलेल्या गुणांप्रमाणे, दैदीप्यमान जळणाऱ्या स्निग्ध आसिडापासून, न जळणारें ग्लिसराईन निराळे केल्याशिवाय त्या दोन्हीं पदार्थाचा मूळ उद्देश व उपयोग यांची पूर्तता होत नाही.
 ग्लिसराईन शिवायचे शुद्ध व घट्ट स्निग्ध आसिड विपुल व स्वस्त कोणत्या रीतीने काढता येईल या गोष्टीचा अद्यापही पुष्कळ उद्योगी लोक शोध करीत आहेत. तेव्हांपासून चिव्हरल एकेका स्निग्ध पदार्थाचें पृथःकरण करीत चालले. सन १८२३ साली त्यांनी 'प्राणिज स्त्रिग्ध पदार्थाचे रासायनिक शोध' या नांवाचे पुस्तक प्रसिद्ध केले. हा वेळ पावेतो त्यांनी फक्त शास्त्रीय शोधाचेच काम केले. त्या शोधापासून द्रव्यप्राप्ति त्यांस झाली नाही. पुढे ह्मणजे सन १८२५ साली पेटंट घेऊन मी० लुझाक साहेबांच्या भागीदारीने स्टिअरीक आसीड काढण्याचा कारखाना त्यांनी घातला. परंतु वस्तूचे रासायनीक ज्ञान चांगले असले ह्मणजे त्या ज्ञानाने ती वस्तू तयार करण्याचा धंदा हमेश फायदेशीरच होतो असे नाही. रासायनिक ज्ञान व त्यायोगाने त्या व्यापारांत होणारा फायदा ह्या दोन गोष्टी अगदी निराळ्या आहेत.
 त्या धंद्यांत चिव्हरल साहेबांस फायदा झाला नाही. परंतु त्या महारसायनवेत्त्याने केलेल्या रोपणीचा फायदा एम. डी. मिली यांस मिळावयाचा होता. सन १८३२ सालीं मिली साहेबांनी फ्रान्सदेशांत बरीची जवळ स्टिअरीक आसिडाच्या मेणबत्त्या करण्याचे काम सुरू केले. त्या