पान:मेणबत्त्या.pdf/299

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७१ नाचे यंत्र इतकें सामान पुरे होईल. उर्ध्वपातानाचे यंत्र आपलेकडे बनूं शकते. ७ चुन्याची साबण क्रिया व तीव्र सलफ्यूरीक आसिडाची क्रिया ( पान १५९) या रीती मजला अवगत. आहेत. त्या रीती कोणास शिकणे असतील तर योग्य ती फी घेऊन शिकविण्यास मी तयार आहे. काडतूस यंत्र माझे इच्छेप्रमाणे कोणी बनवून दिल्यास तीव्र सोडा द्रवाची क्रिया ( पान १५७) घडवून वनस्पतिज तेलापासून मेणबत्त्यांचे घट्ट द्रव्य बनविण्याची रीतही बसवून शिकवून देईन. याचा खुलासा या पुस्तकाचे प्रस्तावनेत पहावा. ८ दरेक घट्ट स्निग्ध आसीड बनविल्यानंतर त्याचे पातळ होण्याचें उष्णमान काढून नंतर मेणबत्ती बनवून जाळावी. ह्मणजे तिच्यांतील गुणदोष समजतात. नंतर दोष दुरस्त करून पुनः अनुभव घ्यावा. या प्रमाणे अनुभव घेऊन नंतर फायदां वाटल्यास कारखाना काढावा. ९ पान २९ वर दाखविलेली ड नळी न वापरतां तिच्या ऐवजी आकृति नं. १२ आकृती नं. १२ मध्ये दाखविलेली अ नळी वापरावी अब ह्मणजे तिच्यांतील घट्ट झालेल्या द्रव्याचा देखावा ब नळीमधील देखाव्याप्रमाणे होईल, १० सरासरी दर रुपायास घट्ट स्निग्ध आसीड कच्च्या सवाचार शेरां( पौंड ) पासून पुढे ह्मणजे साडेचार, पांच शेरपर्यंत कारखानदारास किमतीने पडले पाहिजे. ह्मणजे तीन सवातीन आण्यांत ( कच्चा ) पाऊण शेर मेणबत्त्या विकण्याने थोडासा तरी नफा राहील.