पान:मेणबत्त्या.pdf/300

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७२ ११ मेणवत्तीच्या घट्ट द्रव्याचे पातळ होण्याचे उष्णमान १३२° फा. अंशाच्या वर, प्रकाश पांढरा स्वच्छ व जळणे शांत, राख प्याल्या. बाहेर पडणे, व वाती घातलेल्या व कागदासहित पाऊण शेर मेणबत्त्या विक्रीची किंमत तीन सवातीन. आणे येणे इतके गुण साध्य झाले तर फायदेशीर कारखाना घालण्यास फारशी अडचण नाही. १२ शास्त्रीय पद्धतीने साबूची कला शिकविण्याचा क्लास मी लवकरच काढणार आहे. त्याबरोबर मेणबत्त्या बनविण्याच्या २।४ रीती शिकविण्याचाही क्लास काढावा अशी कियेक मित्रांची सूचना आहे. हे काम- मी गरीब मनुष्य असल्याने फी घेऊन शिकवावे लागेल. तेव्हां शिष्यवर्ग बराचसा जमेल की नाही याची थोडी शंका असल्यामुळे व या कामी थोडेसे भांडवल, हत्यारें, कढया वगैरे घेण्यास्तव लागेल या अडचणीमुळे हे क्लास काढण्याचे काम दिनावधीवर पडले आहे. जास्त खुलासा प्रस्तावनेत पहा. १३ उत्तरास तिकीट आले असतां पत्री लिहून उपयोगी होण्या सारखी माहिती असेल ती देण्यास मी तयार आहे.