पान:मेणबत्त्या.pdf/298

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७० ... ३ या रीतींनी मेणबत्त्यांचे द्रव्य तयार करितांना जें ग्लिसराईन निराळे होतें तें खालच्या पाण्यांत असते ह्मणून ते पाणी धरून ठेवून शुद्ध करावे लागते. त्याची माहिती भाग ८ वा ग्लिसराईन, यामध्ये दिली आहे. ४ या कामी तीव्र आसिडें ( सलफ्युरीक, हायड्रोक्लोरीक, व नाइटीक ) यांचा उपयोग होत असतो. ही आसिडें त्वचेस लागली असतां त्या ठिकाणची त्वचा जळून जाते. अशी ती आसिडें दाहक आहेत. म्हणून त्यांचा उपयोग फारच जपून करावा. जर चुकून असे एखादें तीव्र आसीड त्वचेस लागले तर तो भाग आलकलीचे पाण्याने धुऊन टाकून त्याजवर खोबरेल किंवा दुसरे एखादें तेल लावावें. ५ चुन्याच्या साबण क्रियेनें चरबी (गाई, बैल व डुकरें यांची) मधून घट्ट स्निग्ध आसिडे काढतां येतात. परंतु हिंदू व मुसलमान बंधूंस या कामाचा तिटकारा असल्याने त्या कामी यश येण्याचा संभव कमी आहे. सबब वनस्पतिज तेलें ( मोहड्याचे, तिळाचें, करडीचे. भुईमुगाच्या शेंगांचे, करंजाचें करंजेल, व इतर) घेऊन त्याजवर सलफ्युरीक आसिडाची क्रिया ( पान १५९ रीत ५ वी) घडवून घट्ट स्निग्ध आसीड तयार करणे हल्लींच्या देशस्थितीत फार सोयीस्कर आहे. आतां वनस्पतिज तेल किंवा पातळ ओलिईक आसीड या प्रत्येकावर तीव्र सोडा द्रवाची क्रिया (पान १६७-१७५) घडवूनही घट्ट स्निग्ध आसीड तयार करता येते. परंतु त्या कामी काडतूस सारख्या यंत्राची (पान १६४ ) जरूर आहे. तसे यंत्र मेसर्स रिचर्डसन क्रुडस व कंपनी भायखळा मुंबई हे बनवू शकतील असे मला वाटते. या अडचणीच्या निराकरणार्थ ५ व्या सूचनेचा उपयोग करावा. म्हणजे फक्त दोन तीन कढया एक उष्णतामापक यंत्र व एक उर्ध्वपात