पान:मेणबत्त्या.pdf/297

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जी माझ्या मनापासून सदिच्छा आहे, ती परमेश्वर पूर्ण करो, अशी त्या. सर्व शक्तिमान् प्रभूजवळ माझी प्रार्थना आहे. याप्रमाणे ग्लिसराईन तयार करणे; त्याची परीक्षा करणे; त्याचा उपयोग समजणे आणि व्यावहारिक उपयोगाचे नवे नवे पदार्थ बनविण्याचे दिग्दर्शन करणे, इतकी माहिती दिली आहे; तिचा उपयोग करून निदान मराठी बोलणाऱ्या लोकांनी तरी या सर्व कलेचा लाभ करून घ्यावा, अशी माझी त्यांस खास विनंति आहे. भाग ९ वा. उपयुक्त सूचना. १ मेणबत्तीची कल्पना-कोणत्याही जळण्यायोग्य व घट्ट स्निग्ध पदार्थाची मेणबत्ती होऊ शकते. वनस्पतिज वं प्राणिज तेले व चरबी यांत घट्ट स्निग्धआसीड ( solid fat acid ) असतें. २ वनस्पतिज व प्राणिज तेले .आणि चरबी या दरेकाचे घटक १ ग्लिसराईन २ स्निग्धआसिडें व ३ पाणी इतके आहेत. सबब त्यांतून ग्लिसराईन निराळे करून स्निग्ध आसिडे काढावी. नंतर स्निग्ध आसिडामधील पातळ व घट्ट स्निग्ध आसिडें निरनिराळी करावी. नंतर घट्ट स्निग्ध आसिडांचा मेणबत्यांच्या कामी उपयोग करावा. बाकी राहिलेले जे पातळ स्निग्ध आसिड त्याचा साबूच्या कामी किंवा तें घट्ट करून पुनः मेणबत्त्यांचे कामी उपयोग करावा. ज्या स्निग्ध पदार्थात ग्लिसराईन (प्राणिज व वनस्पतिज मेण) नसते त्यास मेण म्हणतात.