पान:मेणबत्त्या.pdf/293

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६५ ग्लिसराईनची परीक्षा-पाण्यामध्ये बहुतेक पदार्थ द्रवीभूत होतात. त्याचे खालोखाल ग्लिसराईनमध्येही बरेच पदार्थ द्रवीभूत होतात. ग्लिसराईनमध्ये ब्रोमाईन, आयोडाईन व कार्बोलीक आसीड हे पदार्थ पाण्यापेक्षा चांगले द्रवीभूत होतात. मि. क्लिव्हरसाहेब ह्मणतात की १०० भाग ग्लिसराईनमध्ये सोडिअम कार्बोनेट ९३ भाग; तुरटी ४० भाग; हिराकशी २५ भाग; किनाईन व दुसरे आलकलाईड ( सत्वरूप पदार्थ) दरेक अर्धा भाग; आयोडाईन १.९ भाग; फासफरस ०.२ भाग व गंधक ०.१ भाग द्रवीभूत होतो. पिक बरायटा, स्ट्रानशीया, व चुना ( lime ) यांजबरोबर ग्लिसराईन मिळवून मिश्र पदार्थ तयार केले तर ते पाण्यांत अविद्राव्य असतात; व कार्बानीक आसिडाची क्रिया त्या मिश्र पदार्थावर घडविली तरीही साका पडत नाही. ( त्यांतील काही भाग निराळा होत नाही.) ग्लिसराईन बनविण्याच्या रीतीप्रमाणे त्या त्या रीतीमुळे त्यांत कांहीं अशुद्ध पदार्थही राहू शकतात; व त्यांचे वजन अथवा माप वाढावें ह्मणून कोणी त्यांत मुद्दाम इतर पदार्थाची भेसळ करतात. त्या भेसळ केल्या जाणाऱ्या पदार्थात पांढरी व पिवळट ( उसाची ) साखर ( खडी अथवा पिठी ) ही मुख्य आहेत. मि. फिरडीन साहेबांनी ग्लिसराईनमध्ये असणारी भेसळ व अपूर्णता या विषयांची चांगली माहिती दिली आहे: कास्टीक सोड्याबरोबर संशयित ग्लिसराईन उकळावे. नंतर त्याचा रंग तपकिरी झाला तर त्यांत पिवळट साखर किंवा गुळ ( Glucose ) आहे असे समजावें. क्लोरोफार्मबरोबर संशयीत ग्लिसराईन मिळवून ढवळले असतां जर त्या मिश्रणाचे तळी बारीक बारीक कण बसले तर ते कण बहुधा पांढऱ्या ( उसाच्या खडी किंवा पिठी ) साखरेचे असतात. ते काढून घेऊन तपासून पहावे झणजे खात्री होईल. ग्लिसराईन थंड असतांना त्यांत तीव्र सल्फ्युरीक आसीड मिळवावें, व