पान:मेणबत्त्या.pdf/292

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६४ येते तेथे थंड झाल्यावर ज वाटें ह मध्ये शुद्ध ग्लिसराईन पडते. या प्रमाणे जितका चांगला हा पदार्थ हवा असेल तितका वेळ उर्ध्वपातन ( एकदा नुसते व दुसऱ्याने प्राणिज कोळशाबरोबर ) करावे लागते. सहा वेळ उर्ध्वपातन केले असेल तर एक दोन तीन यावेळेस १.२६७ विशिष्टगुरुत्वाचे घट्ट मधासारखें व रंगहीन ग्लिसराईन निघतें; व चार पांच सहाव्या वेळेस निघालेले ग्लिसराईन जास्त पातळ ह्मणजे १.२६७ पेक्षा कमी विशिष्ठगुरुत्वाचे निघतें. सबब चार पांच सहा या वेळेस निघालेले ग्लिसराईन आकृती नं. ९ व १० चे यंत्रांत घालून आटवावे लागते. या आकृती नं. ११ चे यंत्राचा उपयोग युरोप खंडांत या कामी फार करतात. कोणी या पुस्तकाचे पान १३६ वरील आ. नं. ४ मधील डाव्याबाजूच्या (न पासून ड पर्यंत ) यंत्राचाही उपयोग या कामी करतात. प्राणिज कोळशाचे प्रमाण त्या गोड पाण्यांत असणाऱ्या रंगित पदार्थाच्या मानाने घ्यावे. सरासरी दर १०० भाग गोड पाण्यास २-४ भाग प्राणिज कोळशाची भुकटी पुरी होते, ग्लिसराईन-शुद्ध ग्लिसराईन हा पदार्थ बुळबुळीत, रंगहीन, पारदर्शक, घट्टसा प्रवाही ( मधासारखा पातळ ) असून चवस अति गोड लागतो. पाणी, आलकोहल ( मद्यार्क) क्लोरोफार्म, कार्बान बाय सलफाईड इतक्या पदार्थात ग्लिसराईन द्रवीभूत होते ह्मणजे मिळून जाते. परंतु इतर पदार्थांमध्ये तें द्रवीभूत होत नाही. याचे विशिष्टगुरुत्व १.२६७ असते. जळण्यास पुष्कळ हवा व पेटविण्यास जास्त उष्णता असली तर याची जोत तेलाच्या दिव्याच्या ज्वालेप्रमाणे स्वच्छ जळते. रसायन रीतीनें ग्लिसराईनचे घटक का ३ हा ८ आ ३ असे आहेत. किरकोळ भावाने हल्ली बाजारांत कच्या एक शेर (पौंड ) ग्लिसराईनला . सातपासून दहा आणे किंमत पडते. याप्रमाणे ग्लिसराईन हा पदार्थ तयार झाला ह्मणजे तो उत्तम आहे असे समजावें.