पान:मेणबत्त्या.pdf/294

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हालवावें. जर हे मिश्रण काळे झाले नाही, तर तें ग्लिसराईन शुद्ध आहे व काळे झाले तर तें ग्लिसराईन अशुद्ध आहे, असे समजावें. ग्लिसराईनचे उपयोग-याचे उपयोग पुष्कळ आहेत व नव्या नव्या शोधामुळे ते वाढत आहेत. औषधीशास्त्रांत याचा फारच मोठा उपयोग होतो. जेव्हा जेव्हा एखादा पदार्थ कमी जास्त ओलसर ठेवणे असेल तेव्हां तेव्हां तेथे याचा उपयोग करतात. जसे नमुने करण्याची माती, तंबाकू, छापण्याचे कागद, सांधा जुळविण्याचा गोंद, सुत काढणे, तें विणणें, दोर करणे व चामडे कमविणे इत्यादि कामी याचा उपयोग होतो., ग्यासमिटर व फ्लोटिंग कंपासमध्येही त्यांतील पाण्याचे घनीभवन कमी करण्यास्तव याचा उपयोग करितात. यांत मांस ठेवलें असतां तें कुजत नाही. आपलेकडे आंबे वगैरे सर्व ऋतूंत न होणारे पदार्थ नासूं नयेत व पुष्कळ दिवस टिकावे ह्मणून मधांत घालून ठेवितात. त्या कामी ग्लिसराईनचा उपयोग होऊ शकेल.. ग्लिसराईनपासून अलीकडे नायटो ग्लिसराईन या नांवाचा पदार्थ तयार करू लागले आहेत. नायट्रो ग्लिसराईनचा थोडासा उपयोग औषधक्रियेत व फार उपयोग सुरुंग उडविण्यांत व लढाईत उपयोगी पडणारे प्राणनाशक गोळे बनविण्यांत तिकडील लोक हल्ली करूं लागले आहेत. याशिवाय ग्लिसराईनपासून आयसोप्रापील आयोडाईड व आलीलआयोडाईड हे दोन पदार्थ तयार करण्याचा शोध लागला आहे. या दोहोंपैकी प्रत्येकापासून व्यवहारांत उययोगी पडणारे पुष्कळ पदार्थ तयार होऊ शकतील असा रसायनज्ञ लोकांचा आजमास आहे. उत्पत्ति-सन १८७८ साली सुमारे २। कोटी पौंड ग्लिसराइन युरोप खंडांत तयार झाले होते. असा मि. रीची यांचा आजमास आहे. सन १८९१ साली सुमारे ४० हजार टन ग्लिसराईन तयार झाले होते. त्याचे माप देशोदेशचे या खाली दिले आहे ते पहाः