पान:मेणबत्त्या.pdf/291

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

hot आकृती नं. ११ अ हे उर्ध्वपातनाचे भांडे - ( रिटार्ट ) आहे. ब हे त्याचे डोके असून त्यास क ही वाहक नळी लाविली आहे. या क नळीमध्ये ड हा खाडा ठेवला आहे. जर कदाचित जास्त उष्णतेमुळे अ मधील द्रव्य उतू आले तर ते या ड खाड्यांत रहावें. एवढ्याच करितां ड हा खाडा क नळीमध्ये ठेविला आहे. उर्ध्वपातनाने आलेली वाफ धरून थंड करण्यास इ हे खण ( खाने ) ठेविले आहेत. येथे वाफ थंड होऊन ग्लिसराईन ज वाटे ह या हौदांत पडते. हे सर्व यंत्र लोखंडाचे केलेले असते. यांत दरवेळेस अर्धा टन म्हणजे कच्चे २७ मण वजनाच्या पदार्थाचे उर्ध्वपातन होऊ शकते. या वेळेस उर्ध्वपातन करतांना त्याची ( ग्लिसराईनची ) उष्णता ४४०° फा. अंश ठेवावी लागते. काम करण्याची माहिती_ अ या भांड्यांत प्रथम तपकिरी रंगाचें ग्लिसराईन घालावे. नंतर ४४०° फा. अंश उष्णतेवर त्याचे उर्ध्वपातन करावे. या वेळी त्या भांड्यास बाहेरून वाफेची उष्णता दिलेली व आंत गरम वाफ सोडून दिलेली उष्णता असावी. अशा दुहेरी उष्णतेने त्यांतील पदार्थांचे उर्ध्वपातन होते. नंतर ग्लिसराईनची वाफ ई मध्ये थंड होऊन ज वाटें ह मध्ये पुनः ग्लिसराईन रूपाने जमा होते. नंतर फिरून तें ग्लिसराईन प्राणिज कोळशाच्या भुकटीसह अ मध्ये टाकावें व उर्ध्वपातनाचे काम वर प्रमाणेच सुरू करावे. म्हणजे त्यांतील रंगीत पदार्थ प्राणिज कोळशांत राहून शुद्ध ग्लिसराईनची वाफ क वाटें इ मध्ये