पान:मेणबत्त्या.pdf/290

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६२ आहे व ग्लिस जाण्याचे भय कारण जास्त वाफ भरलेली असल्याने ती तापलेली असतात. त्यामुळे पाण्याचा भाग आटला जातो. आता हे आटविण्याचे काम प्रथम २१२०-२५०० फा. अंश उष्णतेवर करावे. कारण जास्त उष्णता लागल्याने ग्लिसराईन उडून जाण्याचे भय असते. आपणास फक्त पाणी आटविणे आहे व ग्लिसराईन काढणे आहे. सबब २१२° फा. अंशांच्या उष्णतेवर पाण्याची · वाफ होऊन उडून जाते व में ग्लिसराईन तळीं रहातें तें बरेचसे घट्ट असते. ग्लिसराईनचे विशिष्टगुरुत्व १.२४० होईपर्यंत याप्रमाणे आटविण्याची क्रिया करावी. या वेळेस त्याचा रंग तपकिरी किंवा लालसर असतो; व तें मधापेक्षा जास्त पातळ असते. त्यास अशुद्ध ग्लिसराईन ह्मणतात. कोणी असेंच (अर्धवट शुद्ध ) ग्लिसराईन बाजरांत नेऊन विकतात. त्याचा उपयोग कापडाच्या, रंगाच्या, शाईच्या, किंवा कित्येक साबूच्या कामी होऊ शकतो. त्यास शुद्ध ग्लिसराईन पेक्षा किंमत कमी येते. _याहीपेक्षा जास्त घट्ट व जास्त रंगहीन (स्वच्छ) ह्मणजे शद्ध ग्लिसराईन काढणे असेल तर त्यास जास्त वेळां आटवावे लागते. सबब त्या अशुद्ध ग्लिसराइनचे उर्ध्वपातन करावे लागते. उर्ध्वपातनानंतर निघालेले ग्लिसराईन एका बाष्पवेष्टित कढईत टाकावे. नंतर त्यांत प्राणिज कोळसा (ivory black ) मिळवून पुन्हा त्याचे उर्ध्वपातन करावे. याप्रमाणे एकदा नुसत्या ग्लिसराईनचे उर्ध्वपातन व दुसव्याने प्राणिज कोळशाबरोबर त्या ग्लिसराईनचे उर्ध्वपातन अशा क्रमानें तें घट्ट ( १. २६७ विशिष्ट गुरुत्वाचे) व रंगहीन होईपर्यंत करावें. या प्रकाराने काम करण्यास निराळे उर्ध्वपातनाचे यंत्र लागते. त्यास ग्लिसराइन रिटार्ट असें म्हणतात याचा नमुना आकृती नं. ११ मध्ये दिला आहे तो पहा..