पान:मेणबत्त्या.pdf/289

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुण्यांचे आंतले बाजूस ती वाफ येते. त्यामुळे ती सर्व बहुगुणी तापतात. या बहुगुण्यांच्या दांड्यास एक लोखंडी हात व चक्र लागू केलेले असते. तो हात फिरता ठेवला म्हणजे ती गरम झालेली बहु. गुणाची रांग तिच्या खालच्या हौदांतील गोड पाण्यात फिरती रहाते. त्यामुळे ते पाणी बहुगुण्यांच्या पृष्टभागावर येऊन पुन्हा त्या हौदांत पडते. गरम बहुगुण्यांचा स्पर्श त्या पाण्यास झाल्याने त्याची वाफ होऊन पाणी उडून ( अटून) गेल्याने कमी कमी होत जाते; व ग्लिसराईन घट्ट होत जाते. आता अशा कढईत ग्लिसराईनयुक्त पाणी उघडे राहिल्याने लवकर आटले जात नाही म्हणून कोणी शोधकाने वरच्या नमुन्याच्या कढईत सुधारणा करून बंद भांड्यांत तें गोड पाणी ठेवून वरीलप्रमाणे अटविण्याचे यंत्र ( कढई) तयार केले. याचा नमुना आकृती नं. १० चे चित्रांत दिला आहे तो पहा. आकृती नं. १० या कढईत आकृ. नं. ९ मधील फिरती बहुगुणी आहेतच. फक्त ग्लिसराईनचे पाणी असलेला हौद गोल असून बंद आहे व त्याच्या वरच्या बाजूस एक नळी लाविलेली आहे. त्या नळीवाटें, आटलेल्या त्या पाण्याची वाफ कढईच्या बाहेर निघून जाते. या आ. नं. १० च्या कढईस व्ह्याक्युअम इव्हापोरेटर ( आटविण्याची पोकळ निर्वात कढई ) असें नांव आहे. यांतील गोड पाण्यात बहुगुणी फिरतात; व त्यांच्यामध्ये