पान:मेणबत्त्या.pdf/287

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५९

ग्लिसराईन शिळक असतें तें ) पान १४४ वरच्या रीतीनें (पान १४९) तयार झालेलें गोड पाणी-ग्लिसराईन युक्त पाणी निघतें त्यांतून ग्लिसरा- ईन काढणें . हैं पाणी चत्रेस आंबट लागतें म्हणजे ते आम्ल असतें. म्हणून त्यास प्रथम निर्गुण करावें लागतें. आम्ल पाण्याची परीक्षा अशी कीं त्यांत परीक्षा करण्याचा जांभळा कागद बुचकळला तर तो लाल किंवा गुलाबी होतो व जिभेवर ते पाणी ठेविलें तर आंबट लागतें. हा अम्ल गुण घालविण्यास त्यांत कळी चुना भुकटी करून थोड थोडा मिळवावा किंवा कळीच्या चुन्याचें पाणी ( Milk of lime ) थोड थोडें त्यांत मिळवावें. कळीचा चुना किंवा त्याचें पाणी त्या अम्ल पाण्यांत मिळवितांना ऊत येतो. तो ऊत येणें बंद होईपर्यंत चुना किंवा त्याचे पाणी मिळवावें. पदार्थ असले नंतर त्यांत कांहीं रंगीत तर ते काढणें तेवढें बाकी रहातें. ती रीत पुढे येईल, ३ प्या रीतीने म्हणजे अति उष्ण वाफ व पाण्याची क्रिया स्निग्ध पदार्थावर घडवून ( पान १२६ ) निघालेलें गोड पाणी रंगहीन असतें. तरी पण मूळ चरबी किंवा इतर स्निग्ध पदार्थातील रंगीत पदार्थ त्यांत थोडे तरी येतातच. सबब ते रंगीत पदार्थ काढून टाकणें किंवा रंगीत पदार्थ त्यांत नसले तर त्या पातळ पदार्थातून पाणी कमी करणे एवढें काम बाकी रहातें. पहिल्या रीतींत आलकली जास्त वापरली असल्यास कधीं कधीं तें गोड पाणी आलकलाईन धर्मींचे म्हणून त्यास निर्गुण करण्यास्तव त्यांत सलफ्युरीक आसि- डाचे पाणी थोडथोडें मिळवावें. ऊत येणें बंद झाले म्हणजे तें पाणी निर्गुण झाले असे समजावें. येथपर्यंत ग्लिसराईनयुक्त पाणी निर्गुण होऊन त्यांत थोडेसे रंगीत पदार्थ आहेत व त्यांत पाणी जास्त असल्याने ज्याचे विशिष्ट गुरुत्व कमी आहे असे ग्लिसराईन तयार असत. • M