पान:मेणबत्त्या.pdf/286

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५८

होणारा पदार्थ जो ग्लिसराईन तो किमतीचा असल्याने टाकून न देतां शुद्धकरून विकला असतां पैसे उत्पन्न होतात. ह्मणून तो शुद्ध करण्याची माहिती दिली आहे.

मेणवत्र्यांच्या कामी निघालेले ग्लिसराईन खालच्या तीन

रीतींनी निघालेले असते त्या रीती:– १ आलकलीची क्रिया स्निग्ध पदार्थोंवर घडवून, २ आसिडांची अम्लक्रिया स्निग्ध पदार्थांवर वडवून, व ३ अति उष्णवाफ व पाणी यांची क्रिया स्निग्ध पदार्थांवर घडवून, ग्लिसराईन व स्निग्ध आसिडें निरनिराळी करतात. रीतीनें ग्लिसराईन तयार झाले असेल, त्या त्या रौतीप्रमाणे त्यांत अस- णारे अशुद्ध पदार्थ निरनिराळे असतात. ह्मणून प्रत्येक ग्लिसराईन शुद्ध करण्यास निरनिराळे पदार्थ वापरावे लागतात. सबब ज्या ज्या १ ल्या रीतीनें ( आलकली क्रियेनें ) निराळें झालेले ग्लिसराईन हें पाण्यामध्यें मिश्र असतें व स्निग्ध आसिडांतील कांहीं रंगीत पदार्थ त्यांत मिश्र असतो. सबब हें गोड पाणी पिवळट, तपकिरी, काळसर अथवा लालसर असें रंगीत असतें व त्यांत आलकलीचे बारीक बारीक कण थोडे बहुत असतात. मेणबत्त्यांची स्निग्ध आसिडें निराळीं करण्यास आलकली ह्मणून बहुतेक ठिकाणीं चुना वापरण्याचा रिवाज आहे. सबब चुन्याचे ( चुना नसला तर झिंक आकसाईड, म्यागनेशिया अथवा बरायटा यांचे ) बारीक कण, तें गोड पाणी गाळण्याचे काग- दांतून किंवा जाड फडक्यांतून गाळून काढल्याने त्या कागदावर किंवा फडक्यावर रहातात; व गोड आणि रंगीत पाणी खाली येतें. नंतर त्यांतील रंग व पाणी नाहींसे करून ग्लिसराईन तयार करणे एवढेच काम बाकी रहातें. ती माहिती पुढे येईल. २ या रीतीनें— आसिडीफिकेशन रीतीनें ( पान १४१ वर ग्लिसराईन जळून जातें असे लिहिले आहे तरी आंबट पाण्यांत थोडेसें=