पान:मेणबत्त्या.pdf/285

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाग ८ वा.

ग्लिसराईन

रीतीने तयार करावें ही माहिती दिली आहे. या पुस्तकांत फक्त मेणबत्त्या बनवितांना निघणारें ग्लिसराईन कशा सांबूच्या कामांत निध- णारें ग्लिसराईन कसे तयार करावें ती माहिती 'साबू' पुस्तकांत दिली आहे ती पहावी. 8 परंतु

ज्या वेळेस ग्लिसराईन या पदार्थाचा उपयोग फारसा माहित नव्हता,

त्या वेळेस हा पदार्थ निरुपयोगी ह्मणून टाकून देत असत. हल्लींच्या काळी औषधें, डायनामिकस व इतर हुन्नरी कामांत या पदा- र्थाचा उपयोग फारच होत असल्याने हा पदार्थ लोक मोठ्या प्रमाणावर तयार करूं लागले आहेत. मा. चिव्हरल साहेबांच्या शोधावरून सर्व स्निग्ध पदार्थीत ग्लिसराईन हा पदार्थ कमी जास्त प्रमाणानें मिश्रित असतो, असे समजले आहे. सर्व स्निग्ध पदार्थोचे घटक ३ जातीचे. असतात तेः --- १ ग्लिसराईन, २ स्निग्ध आसिडें व ३ पाणी. या तीन पदार्थांनी सर्व स्निग्ध पदार्थ बनलेले आहेत. आतां साबू व मेण- बत्त्यांचे काम स्निग्ध आसिडांचा उपयोग होतो व ग्लिसराईन सुटें पडतें, तें ग्लिसराईन फुकट न जाऊं देतां शुद्ध करून वर लिहिलेल्या कामांत त्याचा उपयोग करतात. त्यामुळे त्याची किंमत उत्पन्न होऊं शकते व व्यापारांत फायदा अधिक होतो. . आलकली किंवा आसिडाची क्रिया स्निग्ध पदार्थावर घडवून त्यांतील स्निग्ध आसिडें व ग्लिसराईन निरनिराळी करतात. स्निग्ध आसिडांचा उपयोग मुख्य असल्यानें तीं कशी तयार करावी याची माहिती येथपर्यंत या पुस्तकांत दिली आहे. आतां या कामीं अनुषंगिक रीतीनें उत्पन्न