पान:मेणबत्त्या.pdf/284

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५६

स्क्रू असल्यानें ते स्क्रू काढल्यानंतर दिव्यांस मधोमध भोर्के राहतात. याप्रमाणे वाती शिवायचे हातदिवे तयार करावे. या दरेक दिव्यांत मार्गे लिहिलेल्या वजना इतकेंच ८।१०।१२ तास जळण्यास पुरेल इतकें स्निग्ध द्रव्य असावें.

३ रें काम वाती ठेवणे- इच्छित आकाराच्या वाती इच्छित रसा-

यनिक मिश्रणांत बुचकळून सुकवून ठेवाव्या. दरैक वातीचे शेवटीं टिनचा चौकोनी एकेक पत्रा बसवावा लागतो. या पत्र्यावर हातदिषा बसविला हाणजे त्यास त्या पत्र्याचा आधार रहातो. या चौरस पत्र्याच्या मधोमध भोक पाडलेले असतें. याच भोंकांतून वात ओतावी लागते, नंतर दरेक दिवा डाव्या हातांत घेऊन त्याचें बूड वर करावें. नंतर उजव्या हातानें वात्रीचें शेबट त्यांत घालून वर काढावें, ह्मणजे दिव्याच्या बुडा- खालीं टिनचा पत्रा येतो; व वातीचें खुलें शेवट दिव्याच्या वरच्या भाग येतें. दिव्यामध्यें वात घट्ट बसलेली असावी. नसल्यास तिच्यावर पातळ स्निग्ध द्रव्य थोडेसें ओतावें. ह्मणजे ते घट्ट झाल्यावर ती वात त्या दिव्यास घट्ट चिकटून बसते. याप्रमाणे सर्व दिव्यांत वाती ओवाव्या ह्मणजे हातदिवे तयार झाले. टिनचा पत्रा वातीच्या बुडास घट्ट बसेल अशा रीतीनें वात त्यांत ओवावी. -

४ थें काम – हातदिवे पेट्यांत भरणें-मागें सांगितल्याप्रमाणे

लाकडाच्या किंवा कागदाच्या पेट्या इच्छित आकाराच्या तयार करून ठेवाव्या. दरेक पेटींत ८-१२ हातदिवे भरून ती पेटी बंद करावी. याप्रमाणे भरलेल्या पेट्या कोठारांत ठेवाव्या. हे दिवे उघडया ग्लासांत जाळण्याचा रिवाज आहे.