पान:मेणबत्त्या.pdf/283

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फळीवर सुमारे १४४ भोंके पाडलीं ह्मणजे १४४ दिवे ओतले जातील अशी व्यवस्था करावी. दरेक ओळींत १२ अशा १२ ओळींत १४४स्क्रू एका फळीवर लागू करून त्या दरेक स्क्रू सभोवती एकेक वर्तुळ दिव्याच्या घेरासारखें खोदून तयार करावे. हैं स्क्रू पुढे हातदिव्याचे मधोमध राहून त्या हातदिव्यास उचलून बाहेर काढण्याचे साधन, व त्यामध्ये वात ओवण्यास भोंक पाडण्याचे साधन असतात. दरेक स्क्रू सभोवती एकेक लोखंडी फुकणी ( हातदिव्याच्या आकाराएवढी ) खोदलेल्या वर्तुळांत बसवावी. याच कुंकणीत द्रव्य ओतून दिवे बनवितात. ह्याप्रमाणे त्या फळीवर १२ ओळींतील १४४ स्क्रू पैकी दरेक स्क्रू सभोवती एक फुकणी घट्ट बसविलेली असते. याप्रमाणे पाहिजे तितके साचे तयार करून ठेवावे. - २ रे काम-स्निग्ध द्रव्य साचांत ओतणे-या कामी जें स्निग्ध द्रव्य वापरतात ते खाली लिहिलेल्या प्रकारचे असतेःनं. १ खोबरेल तेलापासून काढलेले स्टिअरीन (कोको स्टिअरीन) भाग १००. नं. २ स्टिअरीन भाग १०-६० कोको स्टिअरीन भाग ९०-५० नं. ३ पामिटिक आसीड भाग १००. नंबर ४ पामिटीक आसीड भाग ६०-७९ खोबरेलतेल भाग ४०-२५. वर लिहिलेल्या पैकी कोणत्याही एक नंबरचे स्निग्ध द्रव्य पातळ करून साचांत ओतावे. व तेथें तें घट्ट होऊ द्यावे. नंतर अधिक असलेलें द्रव्य सुरीने खरवडून काढावें. नंतर फळीवरील पंचपात्रांतील हातदिवे स्क्रूनी बाहेर काढावे. या दिव्याचे मधोमध