पान:मेणबत्त्या.pdf/282

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५४

मेणबत्तीत वात ठेवणे - एक मुलगा ही बात घेऊन तिचा लाल शेवट वरील पातळ लुकणांत बुचकळतो. नंतर तिचें दुसरें शेवट पंच- पात्राखालून त्या वरील मोकांत घालून पंचपात्रांतून वर आणितो. ह्मणजे लुकण लागलेलें शेवट पंचपात्राच्या बुडाशी मधोमध असलेल्या भोकांत बरोवर घट्ट बसले जाते. व ती वात पंचपात्राच्या भोंकावर बोटाचा जरासा दाब दिला ह्मणजे तिचें लाल शेवट पंचपात्राच्या तळाच्या काग- दास चांगलें चिकटतें. नंतर दुसरा मुलगा मेणबत्ती डाव्या हातांत उभी धरून त्या पंचपात्रामधील वातीचें शेवट तिच्यांत खुपसून उज- व्या हातानें ती मेणबत्ती पंचपात्रांत ढकलतो. याप्रमाणें मेणबत्ती पंच- पात्रांत घट्ट बसवावी. मेणबत्तीस भोंक पाडलेले नसल्यास ऊन केलेलें दाभण ( वातीच्या जाडीच्या बेताचें जाड ) मेणबत्तीच्या मधोमध खुप- सून भोक पाडावें. याप्रमाणे सर्व हातदिवे तयार करावे.

४ थे काम हातदिवे पेट्यांत भरणें- ह्या पेट्या लाकडाच्या चि

पांच्या किंवा कागदाच्या करतात. दरेक पेटींत ८-१३ पर्यंत हातदिवे ठेवून ती पेटी बंद करावी. दिव्याचे संखेच्या लांबी रुंदीच्या प्रमाणांत पेंटीची लांबी रुंदी असावी. याप्रमाणे पेट्या भरून बंद करून कोठारांत ठेवाव्या.

हल्लीं वर सांगितल्या प्रकारांहून निराळ्या प्रकारचे हातदिवे करण्या-

चा रिवाज निघाला आहे. या नव्या हातदिव्याचें स्निग्ध द्रव्यही उत्तम प्रकारचें असतें. त्या दिव्यास कागदाची किंवा कार्ड बोर्डचीं पंचपात्रेही लागत नाहींत व ते तयार करण्याची रीतही निराळी आहे. ही माहिती येथें मुद्दाम देत आहे. - १ ले काम. साचे तयार करणें- एक लोखंडी किंवा लाकडी चौरस व साफ फळी घेऊन तिच्यावर स्क्रू बसविण्यास मोके पाडतात. एका