पान:मेणबत्त्या.pdf/281

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५३

३ रें काम – घट्ट द्रव्यांत वात ठेवणें-मागें सांगितल्याप्रमाणे त्या त्या प्रकाराच्या व जाडीच्या वाती धुवून नंतर रसायनिक द्रव्यांत बुचक- ळून वाळवून ठेवाव्या. हात दिव्यांत वाती ताठ ठेवाव्या लागतात. सबब वातीस ताठपणा आणण्याकरितां त्या मधमाशांच्या मेणांत बुचकळून काढतात. नंतर एका लोखंडी पट्टीस त्या वातीच्या आकाराचें भोंक पाडतात. त्या गरम केलेल्या भोंकांतून ती वात खेचून काढावी ह्मणजे साफ होते.

मधमाशाच्या मेणांत वात लवकर बुचकळण्याचें कामही यंत्रावरच

करतात. एका चाकावर लांबच लांब वात गुंडाळलेली ठेवावी. हें चाक एका बाजूस ठेवावें. त्याजवळ, पातळ केलेल्या मेणाचे भांडे ठेवावें या भांड्याच्या दुसऱ्या बाजूस एक रिकामें ( वातीशिवायचें ) चाक ठेवावें. वातीवाल्या चाकावरून वातीचे शेवट मेणाच्या भाड्यांत घेऊन तेथून तें लोखंडी पट्टीच्या गरम भोकांतून काढून पुढे रिकाम्या चाकावर नेऊन बांधून टाकावें. हीं चाकें फिरविलीं झणजे वात मेणांत बुचक- कून साफ होऊन रिकाम्या चाकावर गुंडाळली जाते. या चाकावरील वातीचे तुकडेही इच्छित लांबीचे करून ठेवावे. याप्रमाणे पाहिजे तितक्या वाती तयार करून ठेवाव्या या तुकड्याच्या एका शेवटास लाल रंग देण्याचा रिवाज आहे. जो शेवट पंचपात्राच्या बुडाकडे असतो त्यास लाल रंग देतात. लाल रंग ( भुकटी ) पातळ स्टिअरीन मध्ये मिळवून त्यांत वातीचें शेवट बुचकळून सुकूं चावें. मेणबत्ती मध्ये (हात दिव्यांत ) वात ओवणें. वात पंचपात्राच्या बुडावरील भोकांत घट्ट बसवावी लागते. सबब या काम एक प्रकारचें लुकण ( सिमेन्ट ) तयार करावें लागतें, कार्नुबा मेण व राळ समभाग घेऊन एका भांडयांत उष्णतेवर पातळ करून एकत्र मिळवावी हेंच तें लुकण होय.