पान:मेणबत्त्या.pdf/280

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५२

याचे प्रमाण असे आहे कीं, स्वच्छ प्याराफीन मेण दर तासास १२९ ग्रेन ह्मणजे अकरा आणे भार किंवा ८॥ मासे जळतें; व स्टिअरीन दर तासास १४६ ग्रेनं ह्मणजे चवदा आणे भार किंवा १० मासे आणि मिश्रद्रव्य सुमारें ९ मासे जळतें. तेव्हां ६, ८ किंवा १० तास जळ- गान्या एका दिव्यांत वरीलप्रमाणाने स्निग्ध द्रव्य ओतले पाहिजे. या वरीतीप्रमाणे हिशेब करून इच्छित वजनाचें द्रव्य राहील अशा बेताची पंचपात्रें बनवावीं. प्रकार -

द्रव्य ओतून दिवे तयार करण्याचेही दोन प्रकार आहेत. १ ला

-कोणी द्रव्य पातळ करून पंचपात्रांत ओततात. तेथें तें घट्ट झाल्यानंतर त्यांत वात अडकावून देतात. या रीतीनें काम थोडें होतें. झणून २ रा प्रकार - प्रथम पातळ द्रव्य साचांत ओतून लहान लहान भेणबत्या तयार करतात. या मेणबत्यांत वाती ओवण्यास मधोमध भोकें असतात. नंतर अशा बीन वातीच्या मेणबत्या पंचपात्रांत घट्ट बसवून देतात. नंतर त्यांच्या मधोमध असलेल्या भोकांत वाती अडकावून देतात. हे साचे आकृती नं. ७ मधील साचासारखेच असतात. फक्त वातीच्या ऐवजी खालच्या पट्टीवर तारा ठेविलेल्या असतात. ह्या तारा दट्ट्यांतून व साचामधून वर काढलेल्या असतात. त्या योगें मेणबत्ती ओतली जात असतांना जशी वात तिच्या मधोमध रहाते, तशीच ही तार तिच्या मधो- मध रहाते. साचांतून मेणबत्ती काढून घेतल्यानंतर तार साचांत राहून मेणबत्तीस मधोमध भोंक पाडलें जातें. या प्रकारची व्यवस्था अशा साचांत मुद्दाम करावी लागते. याप्रमाणे पाहिजे तितक्या लांबीच्या व व्यासाच्या ( ३ इंचांपेक्षां लांबी व १-२ इंचापेक्षा व्यास जास्त नसावा ) लहान मेणबत्या पाहिजे तितक्या तयार करून ठेवाव्या.