पान:मेणबत्त्या.pdf/279

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५१

किंवा कार्ड बोर्डाची लहान पंचपात्रे तयार करणें. २ या पंचपात्रांत पातळ द्रव्य ओतून घट्ट करणें. ३ आकार दिलेल्या दिव्यांत वात ठेवणे. ४ तयार झालेले हातदिवे पेट्यांत भरून विक्रीकरितां ठेवणे. वरील कामे करण्याची माहिती खाली दिली आहे.

१ लें काम. पंचपात्र तयार करणे—अलीकडे लाकडी चिपां-

चीं पंचपात्रे फारशीं वापरीत नाहींत. फक्त कागद व कार्ड बोर्ड यांचा उपयोग या काम करतात. अशीं पंचपात्रें कारखानदार कारखान्यांत वनवीत नाहीत. कागदाच्या पेट्या करणारांकडून इच्छित आकाराची व प्रकाराचीं अशीं पंचपात्रे तयार करवून घेतात. रंगी बेरंगी कागदाची व साध्या कागदाची अशा दोन प्रकारांची अशीं पंचपात्रे तयार कर- वितात. विलायतेंत अशी साधीं पंचपात्रें ४॥ आणे ग्रुस व रंगीत कागद लावलेली पंचपात्रें ६ आणे ग्रुस मिळतात. जितकें घट्ट द्रव्य त्यांत ओतावयाचें असेल त्या मानानें दरेक पंचपात्राची लांबी व व्यास ( आकार ) अगोदर निश्चित करून नंतर त्या मापाप्रमाणे पंचपात्रे तयार करवून घ्यावीत. आपल्याकडे हीं अशीं पंचपात्रे कागदाच्या पेट्या करणाऱ्याकडे मुंबई, अमदाबाद व पुणे वगैरे ठिकाणीं होऊं शकतील. या प्रमाणें इच्छित आकाराचीं पंचपात्रे पाहिजे तितकीं तयार करवून कार- खान्यांत ठेवावीं. . २ रें काम. वरील पंचपात्रांत पातळ केलेले द्रव्य ओतून घट करून दिवे बनविणें — या कामीं प्याराफीन मेण किंवा स्टिअरीन अथवा स्टिअरीन व प्याराफीनचें मिश्रण हीं स्निग्ध द्रव्येंच बहुतकरून वापर- तात. आतां जितका वेळ जळणारा दिवा तयार करणे असेल तितका वेळ जळेल, इतकें स्निग्ध द्रव्य वरील एका पंचपात्रांत ओतावें लागतें.