पान:मेणबत्त्या.pdf/278

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

२५०

असते. दरेक दिव्यांत पातळ केलेले प्याराफीन किंवा स्टिअरीन ओतून मध्ये वात ठेवून असे दिवे तयार करतात, ह्मणजे ते उपयोगायोग्य होतात. दरेक दिवा ६, ८, १० तासपर्यंत जळेल इतक्या बेताचे त्यांत द्रव्य ओतलेले असते. असे दिवे एका लाकडी पेटीत १०, ८, ५ भरून विक्रीस ठेवतात.

१ ला प्रकार—साध्या किंवा रंगीत कागदाचे पंचपात्र इच्छित आकाराचे करावें. पाहिजे तितकें प्याराफीन किंवा स्टिअरीन पातळ करून ओतावें. तें घट्ट झाल्यावर त्यास मध्ये एक वात मागे सांगितले. त्या प्रमाणाच्या जाडीची लागू करावी. ह्मणजे हातदिवा तयार झाला किंवा इच्छित लांबीचा तुकडा ( मेणबत्तीचा ) एका कागदाच्या पंचपात्रांत घट्ट बसवून द्यावा. नंतर त्या तुकड्याचा मध्यभागी वात लागू करावी. असे कागदाचे हातदिवे काचेच्या ग्लासांत किंवा टिनच्या भांड्यांत पाणी भरून त्यांत ठेवून जाळण्याचा रिवाज आहे.

२ रा प्रकार-यांत लाकडाच्या चिपा किंवा कार्ड बोर्ड नामक जाड कागदाची पंचपात्र करून त्यांत पातळ द्रव्य प्याराफीन किंवा स्टिअरीन ओतून ते घट्ट करतात. नंतर त्यास मध्ये वात लागू करतात. असे दिवे लहानशा काचेच्या ग्लासांत ठेवून घरगुती कामांत यांचा उप. योग करतात. आरास वगैरे शोभेच्या कामाकरितां तारांनी टांगलेल्या ग्लासांत असे दिवे ठेवून जाळतात. तात्पर्य आपलेकडे जसे घरगुती कामांत लांबणदिवे, पणत्या वापरतात व आरास वगैरे कामांत तेल व पाणी भरून दिवे लावतात, त्या ऐवजी विलायतेंत तेलाचे दिवे न वापरता, घट्ट स्निग्ध द्रव्याचे बनविलेले हातदिवे वापरतात.

असे हातदिवे करतांनाही निरनिराळी चार कामें करावी लागतात. ती कामे:-१ घट्ट द्रव्य ठेवण्यास कागदाची, लाकडाच्या चिपांची,