पान:मेणबत्त्या.pdf/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४९

करू शकतो. याच्या मदतीस हुशार व वाकबगार असा एक मुलगा असला तर ते दोघे एका दिवसांत अशा चार पेट्यावर काम करून कळीसहीत १४४०० मेणबत्या किंवा १८०० शेर द्रव्याचें ओतकाम करूं शकतात. आतां अशा प्रकारची साचांची पेटी बनविण्यास पहिल्या प्रकारच्या मोठ्या साचांच्या पेटीपेक्षां थोडा अधिक खर्च येतो. • पण त्या मानानें काम चांगलें व अधिक होऊं शकतें मेणबत्त्यांस मागा- हून कळ्या पाडण्याची खटपट नाहींशीं होते. आतां हें यंत्र जरी प्रथम स्टिअरीक आसिडाच्या मेणबत्त्या ओतण्याकरितां तयार केलें होतें, तरी पण प्याराफीनच्याही मेणबत्त्या यांत ओतून काढता येतात. याप्रमाणें मेणबत्या ओतण्याच्या तिन्ही प्रकारच्या साचांची बारीक माहिती दिली आहे. ती लक्षपूर्वक अवलोकन करून ज्यानें त्यानें आपल्या सोयी- प्रमाणें पाहिजे त्या पेटीचा उपयोग करावा. प्रकार ४ था. नाईट लाइट्स किंवा हातदिवे ( लांबण दिव्याच्या किंवा पणती- च्या ऐवज वापरतात ते दिवे ) – मेणबत्त्यांचा हा प्रकारही महत्वाचा आहे. असे हातदिवे दोन प्रकारचे असतातः -- १ ला. पाण्यांत ठेवून जळावयाचे हात दिवे. २ रा ग्लासांत किंवा उघड्या जागेवर ठेवून जळावयाचे हात दिवे, हात दिवे ह्मणजे इकडून तिकडे व तिकहून इकडे सहज उचलून नेता आणतां येतील अशा सोईचे व आंत तेला ऐवज मेणबत्त्यांचें द्रव्य असलेले दिवे. यांचा आकार लहान पंचपात्रासारखा असतो व मध्ये बाल