पान:मेणबत्त्या.pdf/276

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शकतो. ह्मणजे दररोज एक मनुष्य ८६४० मेणबत्त्या किंवा १०८० शेर द्रव्याचें ओतकाम करूं शकतो. आतां याच्या मदतीस, हुशार व वाकबगार असा एक मुलगा असल्यास ते दोघेजण ९ यंत्रांवर काम करूं शकतात. त्यामुळे काम करण्याच्या एका दिवसांत ह्मणजे ९ तासांत ( १८ वेळां मिळून ) १२९६० मेणबत्त्या किंवा १६२० शेर द्रव्याचें ओतकाम होऊं शकतें. हा हिशेब प्याराफीन द्रव्याच्या ओत कामाचा आहे. स्टिअरीक आसिडाच्या मेणबत्त्यांचें ओतकाम यापेक्षां कमी होऊं शकर्ते. तसेंच कळीसहित मेणबत्त्यांच्या ओतकामापेक्षां कळीशिवायच्या मेणबत्यांचें ओतकाम जास्त होऊं शकर्ते.

.३ दुसऱ्या प्रकारच्या मोठ्या साचांची पेटी ( यंत्र ) - कळ्या

शिवायची मेणबत्ती, तिच्या घरांत ( स्टान्डमध्यें ) बसवितांना तीस कागद वगैरे गुंडाळून बरोबर घट्ट बसवावी लागते. कळीदार मेणबत्ती, तिच्या घरांत बसविण्यांत असा त्रास पडत नाहीं. या अडचणीमुळे कळीदार मेणबत्याच लोकांत जास्त पसंत पडतात. तसेंच कळीशि वायच्या मेणबत्यांचें ओत काम जास्त होतेसें मात्र वाटतें. परंतु पुढें त्यांस कळ्या काढण्यास वेळ व मेहनत ही लागतेच, सबब कळीसहित मेणबत्या काढणारे साचे वापरावे हे मला अधिक सोइस्कर वाटतें. तरीपण भांडवलाच्या स्थितीप्रमाणें व आपल्या सोयीप्रमाणे पाहिजे त्या प्रकारचें साचे बनवावें हें बरें. आकृती नं. ८ ची साचांची पेटी ही कळीसहीत मेणबत्या ओतून काढण्यास मुद्दाम तयार केली आहे. ह्या एका पेटींतून दर वेळेस स्टिअरीक आसिडाच्या मेणबत्या २०० प्रमाणें निघूं शकतात. एक हुशार व वाकबगार मनुष्य अशा दोन पेट्यावर ओतकाम करूं शकतो. ह्मणजे एक दिवसांत एक मनुष्य अशा दोन पेट्यांतून ७२०० मेणबत्या किंवा ९०० शेर द्रव्याचें ओतकाम