पान:मेणबत्त्या.pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४७

मानानें यांपासून मोठ्या साचापेक्षां कामही कमी होत असतें. ह्मणून अशा साचांचा उपयोग थोडे लोक करितात. लहान प्रमाणावर माल तयार करण्यांत पाहिजे तर या यंत्राचा उपयोग करावा. यांत्रिक साध- नांच्या साचांनीं ( मोठ्या साचांच्या पेटीनें ) तयार होणान्या माला- पेक्षां, तितक्याच हातसाचांनीं सारख्या वेळांत तयार होणारा माल कमी वजनाचा बनू शकतो. दररोज सरासरी नऊ तास काम होतें असें धरिलें, तर एक मनुष्य तेवढ्या ( ९ तास ) वेळांत ८१ शेर मेण- बत्त्या बनवूं शकतो. विसावा न खातां काम केलें तर एक मनुष्य व एक मुलगा दोन पेट्यांवर काम करून १६१ शेर माल तयार करूं शकतात. तात्पर्य मोठ्या साचाच्या मानानें या साचांत माल फारच कमी होऊं शकतो. ह्मणून जास्त खर्चानें यांत्रिक साधनयुक्त मोठ्या साचांच्या पेट्या बनवून त्यांत मेणबत्त्या ओतण्याचें काम, मोठे कारखानदार फार करतात.

२ पहिल्या प्रकारच्या मोठ्या साचांची पेटी ( यंत्र ) - या

यंत्रांत ओतून तयार होणान्या मेणबत्त्यांस पुढचीं बोंडे ( कळ्या ) नस- तात. सबब तीं बोंडे मेणबत्ती तयार झाल्यानंतर करावी लागतात. त्यास श्रम, वेळ व खर्चही थोडा जास्त येतो.

मेणबत्यांची एक खेप तयार होण्यास सुमारें अर्धा तास लागतो,

व एका दिवसांत ९ तास काम करून घेतात. सबब काम कर ण्याचा एक दिवस ९ तासांचा धरितात. याप्रामाणे पहिल्या प्रका रच्या मोठघा साचांच्या पेटीच्या एका यंत्रांतून एक मनुष्य दररोज १४४० मेणबत्त्या तयार करील. पण हा मनुष्य अभ्यासानें जास्त बाकबगार झाला झणजे तो एकटा अशा ६ पेट्यावर ओतकाम करूं