पान:मेणबत्त्या.pdf/274

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४६

त्याच्या आंगची उष्णता बरीच कमी झालेली असते. ह्मणून त्यांत असलेला ज्वालाग्राही पदार्थ मिळविण्याचें भय नसतें. दर १०० शेर मेणब- त्यांच्या द्रव्यांत एक पासून दोन शेरपर्यंत दुर्गंधी नाशक द्रव्य मिळवावें. उंची जातीच्या चकाकीत मेणबत्त्या – स्पर्म्यासिटी किंवा ओझो- किरीट द्रव्याच्या अशा मेणबत्त्या बनविलेल्या असतात. नंतर त्यांस उत्त- म चकाकी व सफाई येण्याकरितां त्या प्रथम चरकावर लावतात. नंतर त्यांस बुरणुसाच्या जाड तुकड्यांत धरून तो चरक फिरवितात. या योगें बुरणुसाच्या जाड तुकड्यानें त्या मेणबत्तीचा सर्व पृष्टभाग घासला जातो, व अशा घासण्यानें तिचा पृष्टभाग फार चकाकीत व सफाईदार दिसतो. याप्रमाणें उंची प्रकारच्या मेणबत्त्यास पालीश केल्यानंतर त्या कागदांत बांधून त्यांचीं पुडकीं बांधतात. www काम ९ वें – मेणबत्त्याचें ओतकाम करण्यासंबंधी इतर किरकोळ माहिती. - १ हातसाचाची पेटी- या यंत्रांत पातळ द्रव्य ओतून मेणबत्त्या बन- बिण्याचें बहुतेक काम हातांनींच करावें लागतें. ह्मणून यास हातसाचाचें यंत्र (पेटी) ह्मणतात. तयार होणाऱ्या मेणबत्त्यांस पुढच्या कळ्या असतात. परंतु ह्या साचांत वाती दर वेळेस ओवाव्या लागतात. एक. सारखी लांबच लांब बात जशी मोठ्या साचांत राहूं शकते, तशी यांत राहू शकत नाहीं. साचे एकदम गरम किंवा थंड करण्यास कृतीचें साधन नसतें. घट्ट झालेल्या मेणबत्त्या, साचाबाहेर जलदीने काढण्यास यांत्रिक साधन नसतें. या साचांनी काम करतांना मानवी हाताचे श्रम अधिक व यांत्रिक साधनाचे श्रम कमी लागतात. सबब साचे वगैरे सामान बनविण्याचा खर्च व ते मांडण्यास जागाही मोठ्या साचांपेक्षां कमी लागते. परंतु या