पान:मेणबत्त्या.pdf/273

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४५

जसे हिंगुळ, नीळ वगैरे मेणबत्त्यांत मिळवूं नयेत. कारण खनिज रंग असलेल्या मेणबत्त्या बरोबर जळत नाहींत. स्टिअरीनमध्यें बहुतेक रंग चांगले मिसळले जातात. पण प्याराफीन मेणामध्ये बहुतेक. रंग मिसळले जात नाहींत. सबब वनस्पतीज किंवा आनिलाईन जातीचे रंग प्रथम थोड्या स्टिअरीनमध्यें मिळवून नंतर ते रंगीत स्टिअरीन प्याराफीन मेणांत मिळवावे. ह्मणजे प्याराफिनमध्येंही रंग चांगले मिसळले जातात. प्रमाण अनुभवानें नक्की करावें.

हिरव्या व तांबड्या रंगाच्या पुड्या ( अनिलाईन ग्रीन व रेड )

आणि रेवंचिनी ( Gamboje ) वगैरे पदार्थ या कामी वापरतात. स्पर- म्यासिटी नामक द्रव्यांत रेवंचिनी मिळविली असतां त्यास मधमाशाच्या मेणासारखा चकाकीत पिंवळा रंग येतो. हा पिंवळा रंग दिसण्यांत सुरेख दिसतो.

६ दुर्गंधनांशक ( Disinfectant) मेणवत्या-या मेणबत्त्या

जळतांना त्यांतून एक प्रकारची दुर्गंधनाशक वाफ बाहेर पडते. तीमुळे आजू बाजूच्या दुर्गंधीचा येणारा वाईट वास कमी होतो, मेणबत्या बन- विण्याचें द्रव्य पातळ केल्यानंतर त्यांत कापूर, गंधक, युकेलिपटसचें तेल, क्याजूपुढी तेल, चंदनाचें तेल, कार्बोलीक आसीड किंवा मसा- ल्याचें तेल, इत्यादि पदार्थोंपैकी कोणताही एक दुर्गंधीनाशक पदार्थ मिळवून नंतर त्या साचात ओताव्या. ह्रीं द्रव्ये मिळवितांना फार काळ- जी घ्यावी लागते. कारण कार्बोलीक आसीड व गंधक हे पदार्थ फार ज्वालाग्राही आहेत. व कित्येक मेणबत्त्यांचें द्रव्य ओततांना फार गरम करावे लागतें. सबब स्टिअरीनच्या मेणबत्त्या ओततांना असले ज्वाला- गृही पदार्थ त्यांत मिळवून नंतर साचांत तें पातळ द्रव्य ओतावें स्टिअ- रीन थिजण्याच्या बेतांत आल्यानंतर ओतावें लागतें; व या वेळेस