पान:मेणबत्त्या.pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ रोपक्यान्डलस-दोरी सारख्या पीळदार मेणबत्त्या. या मेणबत्त्या दिसण्यांत पीळदार दिसतात. तशा प्रकारचे साचे तयार करून त्यांत अशा मेणबत्त्या ओतून तयार करतात. ४ स्पिरलक्यान्डलस-या मेणबत्तीवर स्क्रू सारख्या रेषा रेषा असतात. अशा मेणबत्त्या दोन प्रकारांनी बनवितात. १ला प्रकार-प्रथम साधी मेणबत्ती ओतून तयार करतात. नंतर स्क्रूच्या दोन्यासारख्या खाचण्या पाडलेली लोखंडी पट्टी त्या मेगबत्तीवर लावून चरकानें फिरवितात. त्या योगें ती पट्टी त्या मेणबत्तीवर घासली जाऊन पट्टीवरील खाचण्यांप्रमाणे वरील बारीक दोरे दोरे त्या मेणबत्तीवर उठतात. २रा प्रकार-प्रथम साधी मेणबत्ती ओतून बनवावी. नंतर मोठ्या कच्या डोक्यावर जशी चाकी (हास आंतून स्क्रूसारखे वळ असतात ) असते तशी एक चाकी घ्यावी. या चाकीचे भोक, मेणबत्ती त्यात जरा सखत बसेल इतके मोठे असावे. या भोंकांत स्क्रूचे वेढे असतातच. ती मणबत्ता सम्च्यासारख्या हत्यारात गच्च पकडावी. नंतर ती नाही फिरवीत फिरवीत त्या मेणबत्तीच्या खालच्या भागापर्यंत आणावी. झणजे त्या चाकींतील वेढे त्या मेणबत्तीच्या पृष्टभागावर घासले जातात. त्या मुळे त्या मेणबत्तीवर स्क्रूसारखे वेढे (दोरे) पडतात. मि. ा फिन्टले या गृहस्थाने अशा मेणबत्त्या ओतून तयार करण्याचे एक यंत्रच बनविले आहे. गीत मेणबत्त्या-मेणबत्त्या ओतताना, पातळ ढव्यांत रंग मिळवून, रंगीत मेणबत्त्या तयार करतात. मेणबत्त्यांस ग या कामी वनस्पतिज किंवा आनिलाईन जातीचे रंग वापरावे. खनिज रंग