पान:मेणबत्त्या.pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४३

आसिडाच्या. २ बेलमान्टस्परमच्या ह्मणजे पामिटीक आसिडाच्या ३ प्या- राफीनच्या. ४ ओझोकिरीटच्या. ५ स्परम्यासिटी नामक द्रव्याच्या ६ मेणाच्या. ७ चरवीच्या. ८ कानुबा मेणाच्या. ९ बेलमान्टस्टिअरीन ह्मणजे पामिटीक आसीड व स्टिअरीक आसीड यांच्या मिश्रणाच्या वगैरे.

२ रा प्रकार – मेणबत्त्या दिसण्यांत जशा आकाराच्या व देखाव्या-

च्या दिसतात, त्यावरूनही त्यांस निरनिराळी नांवें देतात जसे प्लेन एन्ड क्यान्डलस ह्मणजे फुंकणी सारख्या ( पुढची कळी नसणाऱ्या ) साध्या मेणबत्या. २ कोनीकल एन्ड क्यान्डलस ह्मणजे कळीदार मेणबत्त्या. ३ रोप क्यान्डलस ह्मणजे दोरीसारख्या पीळदार मेणबत्त्या ४ स्पिरलक्या- न्डलस ह्मणजे स्क्रूसारखे वेढे असणाऱ्या मेणबत्त्या वगैरे बहुतेक मेण बत्त्या पांढऱ्या रंगांच्या करतात. हल्लीं ज्या लाल रंगाच्या मेणबत्त्या इकडे येतात, त्यांचें पातळ होण्याचें उष्णमान वरेंच कमी असतें. सबब त्या जळतांना त्यांतील पातळ द्रव्य बरेंच फुकट जाते.

वर लिहिलेल्या पहिल्या प्रकारच्या मेणबत्त्यांस त्यांच्यांतील मूळ

द्रव्याप्रमाणे नांवें दिलेली आहेत. दुसऱ्या प्रकारच्या मेणबत्त्यांचें वर्णन खाली दिले आहे. १ प्लेन एन्ड क्यान्डलस– ह्मणजे फुंकणीसारख्या मेणबत्त्या. यांस पुढे कळ्या किंवा बोंडे नसतात. या मेणबत्या मेणबत्तीच्या घरांत लागू केल्यावर त्यांची वात पेटविण्यास फार त्रास पडतो. सबब अशा मेणबत्त्या ओतून तयार झाल्यावर नंतर त्यांस पुढच्या कळ्या काढतात.

कोनीकल क्यान्डलस-हाणजे कळीदार मेणबत्त्या हल्लीं आपले

देशांत अशाच फार येतात. ह्या मेणबत्तीस पुढें अणीदार कळी असून त्या कळींतून तिची वात बरीच बाहेर आलेली असते. त्यामुळे ती सुटी वात पेटविण्याचे काम फार सोईवार होऊं शकतें.