पान:मेणबत्त्या.pdf/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३९

१ मेणबत्त्या नेण्याच्या पेट्या मेणबत्या कोणच्याही प्रकारच्या

असल्या तरी ओतकाम करण्याच्या खोलींतून त्या प्याक करण्याच्या खोलीं- त नेल्याच पाहिजेत. सबब त्या भरण्यास चार बाजवांच्या लाकडी पेढ्या वापरतात. ही दरेक पेटी देवदारी असते व तिची लांबी चार फूट, रुंदी एक फूट व उंची १४ इंच असते. या पेटीस पुढची व वरची अशा दोन बाजवा नसतात. अशा पेढ्यांत मेणबत्या भरतात. नंतर दरेक पेटीचें वजन करून ते तिजवर लिहून ठेवतात. ह्मणजे माल किती तयार झाला ते समजते. फुंकणीसारख्या मेणबत्याच्या कळ्या काढण्यास जेथें तें सामान असेल तेथे पाठवाव्या. तेथे त्यांस कळ्या काढल्यानंतर प्याक ओतकाम करण्याच्या करण्याच्या खोळींत पाठवितात. कळीदार मेणबत्या ओ खोलीत पाठवाव्या. --

२ मेणबत्त्या प्याक करण्याचे यंत्र-मेणबत्त्या कागदांत गुंडा-

'ळण्याच्या खोलीतील बाके समोरासमोर मांडलेली असतात. या बाकांच्या ओळींमध्ये जाण्यायेण्याचा रस्ता ठेवावा लागतो. एका बाकावर गुंडा- ळणारा, मनुष्य ( प्याकर ) बसतो, व त्याच्या पुढच्या बाकावर पुडकीं बांधण्याचे यंत्र ठेविलेले असतें. या यंत्रास प्याक करण्याचा ब्लॉक ह्मण- तात. हा ब्लॉक झणजे पाच बाजवांची एक लाकडी पेटी असते. हिची वरची बाजू उघडी असते. हिच्या लांबीच्या व रुंदीच्या दरेक बाजूची फळी पाहिजे तेव्हां अलीकडेच पाहिजे तेव्हां पलीकडे सरकवून त्या पेटीची खोली, पुडक्याच्या इच्छित आकाराप्रमाणे पाहिजे तशी कमी जास्ती करता येते.

गुंडाळणाराच्या उजव्या बाजूस ती पुडकी बंद करण्यास लाखेच्या

कांड्या व जळत दिवा ठेवलेला असतो. कोणी शेगडीवर लाख असलेले भांडे ठेवून / ती पातळ स्थितींत ठेवलेली लाख त्याचे उजवे बाजूस ठेव- तात. काम करणाराच्या मागें तीन पायांच्या स्टुलावर मेणबत्त्या भरले-