पान:मेणबत्त्या.pdf/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणावें याप्रमाणे कळीदार व कळी शिवायच्या म्हणजे फुंकणीसारख्या मेणबत्या तयार करण्याच्या दोन्ही साचांत वर प्रमाणे ओतकाम करावें. कळी शिवायच्या मेणबत्त्यांस पुढे कळ्या तयार कराव्या लागतात. ती माहिती पुढे येईल. ढाका - लायक स्थितींत कागदाच्या पुडक्यांत बांधून रून ठेवणें- काम ७ वें – मेणबत्त्यांचें प्याकिंग ह्मणजे त्या विक्रीस ठेवण्या- ती लाकडी पेट्यांत बंद क - प्रथम फुंकणीसारख्या असणाऱ्या मेणबत्यास पुढची कळी (बोंड ) नसतें. सवत्र अशा मेणबस्यांच्या कळ्या नव्या पाडाव्या लागतात. अशा मेणबत्तीस कळी तीन प्रकारांनी पाडतात १ ला – मेणबत्तीच्या एका बाजूचें शेवट चाकुनें खरवडून तिची पुढची कळी पाडतात. २ रा – एका लहानशा टेबलावर गोलाकृती पात्याची सुरी लागू करून ती फिरती ठेवतात. नंतर त्या सुरीच्या धारेवर त्या मेणबत्तीचे एक टोक हळूच बेतापुरतें धरून तेवढी जागा साफ खरखडून टाकतात. झणजे पुढची कळी तयार होते. ३ रा – सिसापेन सोलण्याज्या शंकाकृती नळीप्रमाणे करून तिच्यांत त्या मेणबत्तीचें एक शेवट घालावे. नंतर ती मेणमत्ती एक नळी वरचेवर फिरवून नळींत असलेल्या पातीनें तेवढी जागा साफ खरवडून काढली ह्मणजे पुढची कळी तयार होते. याप्रमाणें फुंकणीसारख्या मेणबत्यांस कळी असलेल्या मेणबत्या, मेणबत्तीच्या दिव्यांत चांगल्या लागू होतात. 1 कळ्या तयार कराव्या. व दरेकीची वात दिव्याच्या वरच्या भागी असल्याने ती मेणबत्ती लाव- प्याचें काम सोईवार होतें.