पान:मेणबत्त्या.pdf/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३७ जलद, हळूहळू किंवा फार जलदी थंड करावे. १५-२० मिनिटें था बावें. मेणबत्त्या त्यांच्या मध्यभागापर्यंत थंड व घट्ट झाल्याची खात्री झाल्यानंतर इ ठिकाणच्या ब चिमट्यांतील मेणबत्यांच्या खालच्या शेवटाकडील वाती चाकूने कापाव्या. आतां पहिल्या खेपेच्या मेणबत्त्या सुट्या झाल्या आहेत. त्या तेथून काढून एका लाकडी पेटीत भरून प्याक करण्याच्या (कागदांत गुंडाळण्याच्या) खोलीत पाठवून द्याव्या. नंतर ब चिमटे पुन्हा दुसऱ्या खेपेच्या मेणबत्त्या धरण्यास खाली सारून उघइन ठेवावे. नंतर फ दांडा वर दाबून ड दट्टे साचांत हलकेच वर ढकलून, दुसन्या खेपेच्या मेणबत्त्या साचा बाहेर व वर काढून व चिमटयांत गच्च पकडाव्या; व इ या ठिकाणी न्याव्या. नंतर फ दांडा खाली दाबून ड दट्टे साचाखाली आणून त्यांच्या पूर्व स्थितीत साचा-. च्या तोंडाशी बरोबर लागू करून ठेवावे. या खेपेस भिजलेल्या वाती दव्याच्या वरच्या भागीं पिळून टाकाव्या; व तिसऱ्या खेपेचे ओत काम करण्यास सुरवात करावी. याप्रमाणे पाहिजे तितके ओतकाम करावे. एका खेपेचें ओतकाम करण्यास सुमारे अर्धा तास लागतो. म्हणजे काम करण्याचा दिवस ९ तासांचा धरला तर एका दिवसांत १८ वेळ ओतकाम त्याच पेटयांत होऊ शकते. मग साचे गरम करण्यास थंड पाण्यांत वाफ न सोडतां कोणी गरम पाणीच वापरतात. वाफ किंवा गरम पाणी यापैकी पाहिजे तो पदार्थ वापरला तरी नळीची आवश्यकता आहेच. सबब दोन पदार्थ आण. ण्यास दोन नळ्या म्हणजे एक जोड नळी लागते. म्हणून काम करणाराने आपापल्या सोईप्रमाणे योग्य व कमी खर्चाची व्यवस्था करून ध्यावी. उघडया पेटीतील खरवडून काढलेले द्रव्य दुसन्या वेळेस ओतकाम करतांना त्याच जातीच्या चांगल्या द्रव्यांत मिळवून पुनः उपयोगांत