पान:मेणबत्त्या.pdf/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३६

नंतर, कफाचर उलट फिरवून चिमटे मिटवावे. म्हणजे त्या मेणबत्यांची ती वरची शेवटें व चिमटघांत गच्च पकडली जातात. अर्से झाल्यानंतर ब चिमटे असणारी कांब जरा वर सारावी ह्मणजे ती ड्डू या ठिकाणीं जाते. या वेळेस सांचातील मेणबत्त्या बाहेर वर निघून इ या ठिकाणी दाखविल्याप्रमाणे साचावर लोंबत राहतात.

६ ड दट्टे साचाखालीं व बाहेर आणणे-नंतर फ दांडा खालीं

दाबून ड गट्टे पुनः साचाखाली आणून त्यांच्या मूळ स्थितींत ह्मणजे साचांच्या खालच्या तोंडाबरोबर रहातील असे ठेवावे. या वेळेस ठिकाणच्या मेणबत्त्यांच्या खालच्या शेवटांतून निघालेली वात साचामधून इ व्र हाताखालच्या दव्यामधून चाकापर्यंत सबंध अशी असते. ह्मणजे या •वेळेस साचांत वाती आपोआप मधोमध व गंच अशा राहिल्या आहेत. ह्मणून पहिल्या खेपेप्रमाणे साचांत वाती ओवण्यास तार व त्या गच्च बांधण्यास सळया यांची जरूर नसते. याप्रमाणे पहिल्या खेपेचें ओत- काम पुरे झाल्यावर दुसऱ्या खेपेच्या ओतकामाकरितां साचांत वाती ठेवलेल्या आहेतच. सबब दुसऱ्या खेपेनें ओतकाम करण्याची सुर- बात करावी. वरप्रमाणे सहा कामें पुरीं झालीं ह्मणजे मेणबत्त्या तयार होऊन इ या ठिकाणी लोंबत रहातात. ७ दुसन्या खेपेस ओतकाम करणें-- साचातील वाती पहिल्या पातळ द्रव्यानें भिजलेल्या असतात. ह्मणून दव्यांच्या तोंडाजवळ त्या पिळून ( दाबून ) त्यांतील पातळ द्रव्य काढून टाकावें. नंतर पूर्वी सांगिल्याप्रमाणे द्रव्याच्या जातीप्रमाणे साचे गरम करून पाहिजे तितकें गरम द्रव्य लहान भांड्यानें साचांत ओतावें. ते वरच्या उ शड्या पेटींत २-२॥ इंच उंच राहील इतकें ओतावें. नंतर द्रव्या- च्या जातीप्रमाणे ते साचे कमी जास्त वेळांत मार्गे सांगितल्याप्रमाणे