पान:मेणबत्त्या.pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३५

२ स्टिअरीनचें ओतकाम करताना, त्याच्या पातळ होण्याच्या उष्ण-

माना पेक्षां—–१०° फा. अंशांनी कमी उष्णमानाचे साचे गरम ठेवावे लागतात; व ते पातळ द्रव्यही थिजण्याच्या बेतांत झणजे कमी उष्ण असतांनाच साचांत ओतावे लागते. ते साचांत ओतल्यानंतर साचे हळू हळू थंड करावे लागतात.

३ स्परम्पासिटी द्रव्याचें ओतकाम करतांना साचे कमी गरम क

पातळ द्रव्य जास्त गरम ठेवावे लागते. तसेच ते साचांत ओतल्याबरो बर ते साचे फार जल्दीने थंड करावे लागतात. पातळ द्रव्य साचांत घट्ट झाल्यानंतर सर्व द्रव्यांच्या मेणबत्यांचें पुढचें काम एकसारखेंच करावें लागतें. सबब ते वर्णन निरनिराळे न लिहितां पुढे एकत्र लिहिले आहे.

४ दोरे कापणे – याप्रमाणे कोणत्याही द्रव्याच्या मेणबत्या मध्य

भागापर्यंत ( मधल्या वातीपर्यंत ) साचांत घट्ट झाल्या अशी खात्री झाल्यानंतर, साचावरील उघड्या पेट्यांतील अधिक द्रव्य कलथ्यानें खरवडून काढावे. नंतर तें लोखंडी टोपल्यांत भरून एकीकडे ठेवावें. नंतर साचाच्या वरच्या भागावरची मेणबत्यांची शेवटें चाकूने हळूच खरवडून साफ करावी. नंतर आडव्या सळईस बांधलेल्या वाती, साचांच्या दरेक ओळीवर आडवा चाकू फिरवून कापाव्या. सर्व वाती कापल्यानंतर, त्या सर्व रिकाम्या सळया पेटीवरून काढून दुसरीकडे ठेवाव्या. या वेळेस सर्व मेणबत्यांच्या वातींची शेवटें वरच्या भागी मोकळी असतात.

५ मेणवत्या साचाबाहेर काढणे–कफाचर सरकवून व चिमटे

उघडे करावे व ते साचांच्या वरच्या भाग आणून ठेवावे. नंतर फ दांडा वर दाबून त्या साचाखालचे ड दड्डे हलके हलके साचांतून वर चढवावे. ह्मणजे सर्व मेणबत्त्या साचाबाहेर व वरच्या भागी निघून व चिमट्यांता त्यांची वरची शेवटें जातात. मेणबत्यांची शेवटें ब. चिमटयांत आल्या-