पान:मेणबत्त्या.pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६४ अंशापर्यंत गरम करावें. पाणी उकळण्यास लागणाऱ्या उष्णमानाजवळ जवळ या द्रव्याचे उष्णमान ते साचांत ओततांना ठेवावे लागतें. याप्र माणें तें उष्ण व पातळ द्रव्य एका लहाने भांड्यांत घेऊन साचावरील उघड्या पेटींत हलकेंच ओतून द्यावें. सर्व साचे भरून, त्यांच्यावरीलं उघड्या पेटीत ते द्रव्य २-२॥ इंच उंच राहील इतके ओतावें. हें ओतणें पुरे झाल्याबरोबर, अ पेट्यांतील गरम पाणी ग नळीनें फार लवकर बाहेर काढावें व लागलेच थंड पाणी त्या पेढ्यांत भरावें. म्ह- णजे पातळ परंतु फार गरम द्रव्य त्या गरम साचांत ओतल्यानंतर बनेल तितक्या जलदीने ते साचे थंड करावे. याप्रमाणे ते साचे फार लवकर थंड केल्याने त्यांतून निघणान्या या द्रव्याच्या मेणबत्या अर्ध- पारदर्शक ( चकाकीत ) व साफ अशा तयार होतात. नंतर १५-२० मिनिटे थांबावें. म्हणजे साचांतील पातळ द्रव्याच्या मेणबत्या त्यांच्या मध्यभागापर्यंत थंड व घट्ट होतात. कोणी हातसाचांत या द्रव्याच्या मेणबत्त्या ओततात, परंतु हातसाचांत गरमी व थंडी देण्याचें जलद व नियमित साधन नसल्याने हे काम त्यांत बरोबर होऊं शकत नाहीं. स्परम्यासिष्ठी द्रव्य किंमतीनें प्याराफीन ब स्टिअरिन या द्रव्यापेक्षां फार महाग आहे सबब हैं काम फार जपून करावें.

वरील चार द्रव्यांचे घटक निरनिराळे असल्यामुळे, त्यांचें ओतकाम

करते वेळेस, साचे, पातळ द्रव्य व ते थंड करण्याचा वेळ यांत बरीच तफावत आहे. निरनिराळ्या द्रव्याचें ओतकाम करण्याच्या वेळेस मुद्याची तफावत काय असते ती खालीं दर्शविली आहे.

१ व्याराफीन व ओझोकिरीट या द्रव्यांचें ओतकाम करतांना त्यांच्या

पातळ होण्याच्या उष्णमानापेक्षां, साचे व पातळ द्रव्य यांचें उष्णमान जास्त ठेवावें लागतें; व पातळ द्रव्यं साचांत ओतल्यानंतर ते साचे जलदीनें थंड करावे लागतात.