पान:मेणबत्त्या.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३३

० - ओतावें. याप्रमाणे सर्व पेट्यांतील साचे भरावे. नंतर ग मळीने गरम पाणी बाहेर काढून थंड पाणी अ पेट्यांत भरावें. पुढे तीन चार मिनिटांनीं या नव्या थंड पाण्यांत वाफ सोडून ते ११० फा. अंश गरम करावें. पुनः तीन चार मिनिटांनी हें गरम पाणी ग नळीने पेट्याबाहेर काढावें. नंतर पुनः त्यांत थंड पाणी भरावें. यांतही पुनः तीन चार मिनिटांनी वाफ सोडून ते ११० फा. अंशपर्यंत गरम करावें. याप्रमाणे गरम व थंड पाणी आळीपाळीनें अ पेठ्यांत १५- २० मिनिटें राखून ते साचे थंड करावें. कोणी प्रथमचेंच सर्व गरम पाणी अ पेटीबाहेर न काढतां थोडेंसें गरम पाणी ग नळीने बाहेर काढतात. नंतर त्यांत तितकेंच थंड पाणी मिळवितात. पुनः तीन चार मिनिटांनीं थोडेसे गरम पाणी बाहेर काढून तितकेंच थंड पाणी त्यांत मिळवितात. याप्रमाणे १५-२० मिनिटें करून ते साचे थंड करतात. तात्पर्य, साचांतील पातळ स्टिअरीन एकदम थंड न करतां हळू हळू थंड करावें लागते याप्रमाणे ते पातळ द्रव्य साचांत हळू हळू थंड होईल अशी कमीकमी उष्णता १५-२० मिनिटें साचांस लावावी. १५-२० मिनिटांत साचांतील पातळ द्रव्य ( आतां मेणबत्या.) त्यांच्या मध्य भागापर्यंत थंड व घट्ट होतात. ४ स्पर्म्यासिटी नामक द्रव्याचे ओतकाम करणें--पान २२४ वर लिहिलेल्या नंबर ५, ६, ७ पैकी कोणत्याही एक नंबरचें मिश्रण घ्यावें. मागें सांगितल्याप्रमाणे साचांत पाहिजे त्या वाती ठेवाव्या. अ पेढ्यांत थंड पाणी व वाफ सोडून त्यांतील साचे १०० - ११०° फा. अंशा पर्यंत गरम करावे. स्पर्म्यासिटी नामक द्रव्याचें पातळ होण्याचें उष्णमान सुमारे ११० - १२०° फा. अंश असतें. सबब साचे त्यापेक्षां १० ° फा. अंश कमी उष्ण ठेवावे. नंतर काम ४ मध्ये सांगितल्याप्रमाणे स्पर्म्यासिटी नामक द्रव्य कोरडें व पातळ करून ठेवलें असतें तें २००-२१० फा ० - ०