पान:मेणबत्त्या.pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३०

साचा सभोवतालच्या पाण्यांत मळ असला तर अशा मळकट

पाण्यानें ते साचे लवकर थंड होत नाहीत. ह्मणून ते साचे फार गरम केले तर त्यांतून निघणाऱ्या मेणबत्त्या स्पर्शास तेलकट, खरबरीत व काळसर दिसतात. प्याराफीन व स्पर्म्यासिटी या द्रव्यांचें ओतकाम करतांना ही गोष्ट लक्षांत ठेवावी. जर प्याराफीन मेणांत सुटे ( यांत्रिक संयोगानें) तेल मिश्र असेल तर त्यापासून होणाऱ्या मेणबत्त्यांत टिपकेटिपके दिसतात. हा दोष घालविण्यास त्या प्याराफीनमध्ये शेंकडा ४-५ भाग स्टिअरिक आसिड ह्मणजे स्टिअरिन मिळवून नंतर त्या मिश्र द्रव्याच्या मेणबत्या बनवाव्या.

साचांचें उष्णमान बेताचे करण्यास्तव, अ बंद पेटींतील साचांच्या

ओळींमध्ये भोके पाडलेल्या जोड नळ्या ( एक वाफेची व दुसरी थंड पाण्याची ) लागू केलेल्या असतात. ३ ओतकाम करणें- ओतकाम करतांना पातळ द्रव्याच्या जाती- प्रमाणे साचे व द्रव्याचें उष्णमान निरनिराळे ठेवावे लागतें. पुढेही ते साचे कमी जास्त वेळांत थंड करावे लागतत्त. या विषयाची समजूत चांगली व्हावी ह्मणून दरेक मुख्य द्रव्याचें ओतकाम करण्याची माहिती मुद्दाम निरनिराळी खाली दिली आहे.

१ प्याराफीन मेणाचे ओतकाम करणे – या कामी पान २२४

वर लिहिलेल्या नंबर १, २, ३ व ४ च्या मिश्रणांपैकीं कोणतेही एक मिश्रण घ्यावें. तें कोरड्या कढईत कोरडें व पातळ करून ठेवावें. नंतर म नळ्यांपैकी थंड पाण्याच्या नळीचा कॉक फिरवून पुढे पेट्याबाहेरचे कॉक फिरवावे. हाणजे अ पेट्यांत थंड पाणी येऊ लागते. पेट्या थंड पाण्यानें भरल्या ह्मणजे पेट्याबाहेरच्या थंड पाण्याच्या नळीचे कॉक बंद करावे. नंतर म जवळील वाफेच्या नळीचा काँक व पेट्या- बाहेरील वाफेच्या नळीचे कॉक फिरवावे. हह्मणजे अ पेट्यांतील थंड पा -