पान:मेणबत्त्या.pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२९

रेषाकृति चिन्हें असलीं तर असे समजावें कीं, तिच्या पातळ द्रव्याचा साचाशी संयोग झाला, तेव्हां ते दोन्ही पदार्थ थंड स्थितीत होते. जे साचे आंतून उत्तम प्रकारचे गुळगुळीत व स्वच्छ केलेले असतात, त्यांचीसुद्धां बाह्य बाजू, पाणी राहणारी बंद पेटी उघडून वरचेवर साफ करून ठेवावी लागते. त्यांची बाह्य बाजू स्वच्छ नसली तर ते साचे लवकर थंड होत नाहीत.

प्याराफीन या द्रव्याच्या मेणबत्त्या साचांत ओततांना या पातळ

द्रव्याचें उष्णमान १७०-१८०° फा. अंश असावें; व ते साचेही सुमारें १५०° फा. अंश उष्ण करावे. नंतर त्या उष्ण साचांत उष्ण द्रव्य ओतल्याबरोबर ते साचे जलदी थंड करावे. ह्मणजे प्याराफी- नच्या मेणबत्त्यावर चांगली सफाई व चकाकी येते.

स्टिअरीनच्या मेणबत्या ओततांना पुढे लिहिलेली काळजी

घ्यावी लागते. स्टिअरीन हे पातळ द्रव्य साचांत ओततांना तें थिज- ण्याच्या बेतांत ( मात्र त्यांत गोळे किंवा गुठळ्या नसाव्या) आले झणजे गरम साचांत ( स्टिअरीन पातळ होण्यास लागणाऱ्या उष्णमानापेक्षां १०° फा. अंश कमी उष्णमानाच्या गरम साचात ) ओतावें. या वेळेस त्या साचांची उष्णता सुमारे १२०° - १३०° फा. अंश असावी, कारण साधारण प्रतीच्या स्टिअरीनचें पातळ होण्याचें, उष्णमान सुमारें १३०°१४०° फा. अंशाचें असतें. सबब यापेक्षां १०° फा. अंश कमी झणजे १२० - १३०° फा. अंश उष्ण मानाचे ते साचे असावेत. वरप्रमाणें दोन्ही पदार्थांचें उष्णमान ठेवून स्टिअरीन साचांत ओतल्यावर ते साचे एकदम थंड करूं नयेत. पण त्या अ बंद पेटींतील गरम पाण्यांत थोडथोडें थंड पाणी मिळवीत जाऊन त्या साचांची उष्णता हळू हळू कमी करावी.