पान:मेणबत्त्या.pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३१

ज्योत वाफ येऊ लागते. या वाफेनें पेट्यांतील पाणी सुमारे १५०° फा अंश गरम करावे. त्या पाण्याचीही उष्णता समजण्याकरितां अ या बंद पेढ्यांच्या वरच्या उघड्या भागांत एकेक भोक ठेवलेले असतें. त्या भोकावाटें उष्णतामापक यंत्र पेटींतील पाण्यांत घालून, किती उष्णता आहे तें तपासावें. बरेच वेळां काम केल्यानंतर झालेल्या अभ्यासानें उष्णतामापक यंत्राची जरूर लागत नाहीं. फक्त त्या प्राण्यांत बोट घात- ल्याने किंवा अ पेटीस बाहेरून तळहात लावल्यानें किती उष्णता आहे तें समजूं लागतें. याप्रमाणे अ पेठ्यांतील पाण्याची उष्णता १६० फा. होतात. अंश झाली ह्मणजे त्या पाण्यांत असणारे साचेही तितकेच गरम हो अर्से झाले झणजे वाफ सोडणे बंद करावें. D ·

नंतर काम ४ मध्ये सांगितल्याप्रमाणे प्याराफीनचें मिश्रण ( कोण-

त्याही एका नंबरचें ) कोरड्या कढईत कोरडें व पातळ करून ठेवलें असेल ते १७०-१८०९ फा. अंशपर्यंत गरम करावें. यांत प्याराफीन मेण जितके जास्त असेल तितके जास्त उष्ण हे द्रव्य ओततांना ठेवावें लागतें. मात्र त्याचे उष्णमान १७०९ फा. अंशापेक्षा कमी व १८० फा. अंशापेक्षा जास्त असूं नये. याप्रमाणें गरम केलेले द्रव्य एका लहान भांड्यांत घेऊन, साचाबरील उघड्या पेटींत हलकेंच ओतून द्यावें. या पातळ द्रव्यानें साचे भरले झणजे जास्त राहिलेले द्रव्य त्या उघड्या पेींत जमतें. तें सुमारें वरील उघड्या पेटीत २-२॥ इंच उंच ( जाड ) राहील इतके ओतावें. साचांतील पातळ द्रव्य थंड होतांना जागा रिका- मी होत जाते ती भरण्यास वरच्या पेटींतील अधिक द्रव्य उपयोगी पडते. ह्मणून त्यावरील पेटींत अधिक पातळ द्रव्य टाकावें लागते. याप्रमाणे सर्व पेट्यांतील साचे भरावे. साचांत पातळ द्रव्य ओतल्यानंतर लगेच प्रत्येक अपेढींतील गरम पाणी, गनळीचा कॉक उघडून गठरांत सोडावें ह्मणजे ते मोरींत जाते. नंतर लगेच थंड पाण्याच्या नळीचे 171 18