पान:मेणबत्त्या.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२८

गुंडाळलेल्या चाकावर तो दुमटलेला भाग येतो. नंतर त्या चाकावरील वातीचें शेवट, तारेच्या या दुमटलेल्या भागांत अडकवून द्यावें. नंतर ती तार वर ओढावी. ह्मणजे वातीचे ते शेवट त्या दद्व्यांतून त्या साच्या वरच्य भाग येतें. याप्रमाणें सर्व दट्यांतून सर्व वासी वर आणाव्या. आतां .साचांच्या वर आलेल्या वाती न हालतां गच्च मधोमध रहातील अशा ठेवगें आहेत. मार्गे सांगितल्याप्रमाणे साचांच्या दरेक ओळीवर एकेक आडवी सळ- ई ठेविली आहे. या सळईस दरेक वातीचें वरचें शेवट गच्च व ती वात त्या साचाच्या मधोमध राहील असे बांधावें. अशा प्रकारें सर्व वाती चीं शेवटें बांधून टाकावीं. ओतकाम करण्याच्या फक्त पहिल्या खेपेसच हें काम करावें लागतें. सर्व वाती सळ्यांस गच्च बांधल्यानंतर फ दांडा उलट फिरवावा. ह्मणजे ड दट्टे खालीं जातात ते त्या त्या साचाखालीं व त्यांच्या खालच्या तोंडाशी बरोबर लागू करून ठेवावे. याप्रमाणें पहिल्या किंवा दुसऱ्या प्रकारच्या सर्व साचांत वाती ओवाव्या. २ साचे व पातळ द्रव्याचे उष्णमान-पातळ द्रव्य साचांत ओतण्यापूर्वी माचाचें, व २ पातळ केलेल्या द्रव्याचें उष्णमान, आणि ३ उष्ण द्रव्यानें भरलेले साचे, किती वेळांत व कसे थंड करावे इतकी माहिती अवश्य असावी. ही माहिती नसली तर मुळ द्रव्य चांगले असूनही तयार होणाऱ्या मेणबत्या दिसण्यांत खरखरीत, तेल- कट व खराब अशा होतात.

जर साचे व पातळ द्रव्य यांपैकीं एक अथवा दोन्ही पदार्थ फार

थंड असले, तर असें थंड द्रव्य अशा थंड साचांत ओतून तयार होणा- या मेणबत्त्यांस भोक भोकें राहतात. कारण त्या पातळ परंतु थंड द्रव्यांत अडकून राहिलेले हवेचे बुडबुडे त्यांतून बाहेर निघून जाण्यास अवश्य जी उष्णता ती त्या दोहोंतही नसते. तसेच त्या थंडपणामुळे, मेणबत्त्यांच्या पृष्ठभागावर रेषाकृती चिन्हेंही उठतात. मेणबत्तीवर